शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

कॅरम : महेश रायकरआणि चैताली सुवारे अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 10:06 PM

महेश रायकरने अग्रमानांकित ओमकार टिळकचा २५-४, १३-२५, २५-११ असा पराभव केला.

मुंबई : के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या तेराव्या आंतर महाविद्यालय रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे विरारच्या विवा महाविद्यालयाचा महेश रायकर व डोंबिवलीच्या मॉडल महाविद्यालयाची चैताली सुवारे यांनी विजेतेपद पटकाविले. ही प्रतिष्ठित आंतर महाविद्यालय कॅरम स्पर्धा श्रीमती पी. डी. हिंदुजा ट्रस्टतर्फे के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, ठाणे, पालघरच्या कानाकोपऱ्यातून ३०० युवा खेळाडूंचा सहभाग लाभला. अंतीम फेरीच्या रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत विवा महाविद्यालयाचा तिसरा मानांकित महेश रायकरने आपल्यापेक्षा अनुभवी मिठीबाई महाविद्यालयाचा गतविजेता अग्रमानांकित ओमकार टिळकचा २५-४, १३-२५, २५-११ असा पराभव करून स्पर्धेत मोठी खळबळ माजवत विजेतेपदाचा मानकरी ठरला.

पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस्‌ व आक्रमक खेळ करत महेश रायकरने पाचव्या बोर्डपर्यंत १७-४ अशी अशी आघाडी घेत सहाव्या बोर्डमध्ये ८ गुण मिळवून २५-४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ओमकार टिळकने ७-७ अशी बरोबरी केली. नंतरच्या दोन बोर्डात ८ आणि ९ गुण मिळवून २५-१३ असा जिंकून १-१ ने बरोबरी साधली. नंतरच्या तिसऱ्या निर्णायक गेममध्ये महेश रायकर शांत चित्ताने खेळत बचावात्मक खेळाचे व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ४ बोर्डापर्यंत १८-९ अशी आघाडी घेतली. नंतरच्या तीन बोर्डात ६ आणि १ गुण मिळवून २५-११ असा तिसरा गेम जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात पाटकर महाविद्यालयाच्या शशांक शिरोडकरने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सरळ लढतीत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ध्रुव जाधवचा २५-९, २५-६ असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मिठीबाई महाविद्यालयाच्या ओमकार टिळकने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ध्रुव जाधवचा २५-५, ११-२५, २५-० असा पराभव करून अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विवा महाविद्यालयाच्या महेश रायकरने अत्यंत आक्रमक खेळाचे व अप्रतिम शॉटस्‌चे प्रदर्शन करत पाटकर महाविद्यालयाच्या शशांक शिरोडकरचा १४-२५, २५-१२, २५-१० असा तीन गेम रंगलेल्या चुरशीच्या उत्कंठापूर्ण सामन्यात पराभूत करून अंतीम फेरी गाठली. 

महिला एकेरीमध्ये बिनमानांकित डोंबिवलीच्या मॉडल महाविद्यालयाच्या चैताली सुवारेने अत्यंत आक्रमक व बचावात्मक खेळाचे मिश्रण करत अग्रमानांकित आर. ए. पोतदार महाविद्यालयाच्या सोनल सावंतचा दोन गेम रंगलेल्या उत्कंठापूर्ण चुरशीच्या लढतीत २५-१०, २५-१८ असे नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आपले वर्चस्व सिद्ध करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

 

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॉडल महाविद्यालयाच्या चैताली सुवारेने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी लढतीत डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या दिक्षा नायकवर २५-३, २५-० अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर. ए. पोतदार महाविद्यालयाच्या सोनल सावंतने के. ई. एस. श्रॉफ महाविद्यालयाच्या प्रणाली शहाचा दोन गेम रंगलेल्या सामन्यात २५-१४, २५-३ अशी मात करत अंतीम फेरी गाठली. 

टॅग्स :Mumbaiमुंबई