शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवशक्तीचा विजेतेपदावर कब्जा

By admin | Updated: April 9, 2015 01:07 IST

आक्रमक सुरुवात करताना शेवटपर्यंत वर्चस्व राखलेल्या सामन्यात बलाढ्य शिवशक्ती संघाने तुल्यबळ मुंबई पोलिसांना २७-१० अशी सहजपणे मात

मुंबई : आक्रमक सुरुवात करताना शेवटपर्यंत वर्चस्व राखलेल्या सामन्यात बलाढ्य शिवशक्ती संघाने तुल्यबळ मुंबई पोलिसांना २७-१० अशी सहजपणे मात देत सहयोग मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद पटकावले. दादर येथील दीनानाथ दलाल मैदानात मुंबई जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फी झाला. शिवशक्तीच्या अपेक्षा टाकळेने स्पर्धेतील धडाका अंतिम सामन्यात देखील कायम राखताना पहिल्याच चढाईत पोलिसांच्या मध्यरक्षकाला बाद करीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी पोलिसांच्या भक्ती इंदुलकरने बोनस गुण घेताना शिवशक्तीला जोरदार प्रत्युत्तर दिले.यानंतर मात्र शिवशक्तीच्या उजव्या कोपऱ्यावरील रेखा सावंत आणि डाव्या कोपऱ्यावरील ॠतुजा देऊलकर या रक्षकांनी भक्कम संरक्षक करताना मुंबई पोलिसांना गोंधळून टाकले. या दोघींच्या जोरावर शिवशक्तीने मध्यंतराला १४-७ अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्रात भक्ती आणि शिरीषा शेलार यांनी उत्कृष्ट खेळ करताना पोलिसांचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भक्तीची पकड करताना शिवश्क्तीची मंगला माने जयाबंदी झालेली, मात्र तरीदेखील ती खेळली आणि पुन्हा एकदा भक्तीची यशस्वी पकड केलीे. यानंतर पोलिसांनी पुनरागमनाचे प्रयत्न सोडल्याने शिवशक्तीने विजेतेपदावर नाव कोरले. (क्रीडा प्रतिनिधी)