शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यात रिमझिम पाऊस, भारत-पाक सामन्यात येणार व्यत्यय?

By admin | Updated: March 19, 2016 12:18 IST

कोलकात्यातील ईडन गार्डनवर आज संध्याकाळी होणा-या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट रसिकांचा पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - कोलकात्यातील ईडन गार्डनवर आज संध्याकाळी होणा-या भारत-पाकिस्तान टी-२० सामन्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट रसिकांचा पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. कोलकात्यात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असून संध्याकाळपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 
आज सकाळपासूनच कोलकात्यातील वातावरण ढगाळ झाले असून अधुनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. दिवसभर हीच परिस्थिती कायम राहू शकते वा वीजांच्या कडकडाटासाह आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास एकतर कमी षटकांचा सामना खेळवला जाईल वा तो रद्दही होऊ शकेल. 
न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभवाचा शॉक बसलेला भारतीय संघ आज, शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सर्वाधिक चर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात आयसीसी स्पर्धेत पाकविरुद्ध अजिंक्य राहण्याच्या विक्रमाची पुनरावृत्ती करण्यासह स्पर्धेतील आशा कायम राखण्याचेही भारतापुढे आव्हान असेल. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामनाच रद्द होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. 
 
 
भारताच्या विजयासाठी देशभरातील चाहत्यांची प्रार्थना
दरम्यान आजच्या सामन्यात भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला नमवावे यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. वाराणसी, लखनऊ, मुंबईत विविध ठिकाणी होम-हवन करून विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. तर गोरखपूरमध्येही दर्ग्यात चादर चढवून भारताच्या विजयासाठी दुवा मागण्यात आली. 
 
पुरी येथे शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळूत शिल्प साकारून भारतीय संघाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
 
कोईम्बतूरमध्ये चाहत्यांनी ६ फुटी उदबत्ती उभारून भारतीय संघाला शुभेच्छा देत विजयासाठी प्रार्थना केली.