शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्य

By admin | Updated: July 7, 2017 01:28 IST

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत

भुवनेश्वर : महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत लक्ष्मणने सुवर्णपदक जिंकून आशियाई अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. दुसरीकडे मनप्रीत कौरने गोळाफेकने सुवर्ण, विकास गौडाने थाळीफेकमध्ये कांस्य, महिलांच्या लांबउडीत व्ही. नीनाने रौप्य, तर नयन जेम्सने कांस्यपदक जिंकले. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने १६ मि. ००.२४ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित करून महाराष्ट्राची शान वाढविली. कॅग्रीस्थानच्या दारीया मास्लोव्हाने १५ मि. ५७.९७ से.ची वेळ नोंदवून सुवर्ण, तर यूएईच्या आलिया मोहम्मदने १५ मि. ५९.९५ से.ची वेळ नोंदवून रौप्य जिंकले.भारताच्या मनप्रीत कौरने महिलांच्या गटात १८.२८ मीटर गोळा फेकून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित करून, आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. चीनच्या गुओ तियानविचनने १७.९१ मीटर, तर जपानच्या आयाओटाने १५.४५ मीटर गोळा फेकून अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात शेवटच्या क्षणी प्रवेश मिळालेल्या भारताच्या विकास गौडाने ६०.८१ मीटर थाळी भिरकावून कांस्यपदक जिंकले. या प्रकारात इराणच्या एअसान हदादीने ६४.५४, तर मलेशियाच्या मोहम्मद इरफानने ६०.९६ मीटर थाळी फेकून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. विकास हा या प्रकारात गेल्या दोन स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेता आहे. त्याने यापूर्वी पुणे (२0१३) आणि वुहान (२0१५) या स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. दरम्यान, मुहम्मद अनस, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांनी ४00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सेमिफायनलमध्ये धडक मारून पहिला दिवस गाजवला. (वृत्तसंस्था)ही माझ्या आयुष्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वश्रेष्ठ कामगिरी असून, मी या कामगिरीवर समाधानी आहे. १८ मीटरच्या पुढे गोळाफेक करायची इतकेच लक्ष्य मी ठेवले होते, त्यात सफल झाले.