शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ब्रिज, पॅरा खेळाडूंचा क्रीडा खात्याला पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:19 AM

जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील पदकविजेत्या १० खेळाडू व मार्गदर्शकांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

पुणे : जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील पदकविजेत्या १० खेळाडू व मार्गदर्शकांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ब्रिज आणि पॅरा खेळाडूंच्या नावाचा विसर क्रीडा खात्याला पडला आहे. मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात नेमबाजी, कबड्डी, सेलिंग, नौकानयन आणि शुटिंग आणि स्कॉश या खेळातील पदकविजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण ३ कोटी ७२ लाख रोख पुरस्कारांचे वाटप क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात दुपारी होणाºया या कार्यक्रमासाठी राज्याचे क्रीडामंत्री उपस्थित राहतील. विविध राज्यांनी आपल्या पदकविजेत्यांना रोख पारितोषिकांची घोषणा केली, त्या वेळी महाराष्ट्रानेही आपल्या सुवर्ण पदक विजेत्यांना ५० लाख व मार्गदर्शकाला १२ लाख, रौप्य विजेत्यांना ३० लाख व मार्गदर्शकाला ७ लाख, कांस्य विजेत्यांना २० लाख व मार्गदर्शकाला ५ लाख रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. ‘खेलो महाराष्ट्र’ क्रीडा स्पर्धा संदर्भात होणाºया बैठकीनंतर या खेळाडूंना रोख गौरविण्यात येईल. पण, आशियाई स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज स्पर्धेत भारताने १ सुवर्ण व २ कांस्य पटकावली. यात कांस्य जिंकणाºया संघात महाराष्ट्रातील काही खेळाडू होते. तसेच, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सुयश जाधवसह काही खेळाडूंनी पदके जिंकली होती. या खेळाडूंचा विसर शासन व क्रीडा खात्याला पडल्यामुळे हे खेळाडू मंगळवारी होणाºया कार्यक्रमापासून वंचित राहतील.