क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होणार ब्रेट ली

By Admin | Updated: January 16, 2015 04:16 IST2015-01-16T04:16:55+5:302015-01-16T04:16:55+5:30

आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली बिग बॅश लीग (बीबीएल)नंतर क्रिकेटच्या संपूर्ण प्रकारांतून निवृत्त होणार आहे़

Brett Lee will be retiring from all forms of cricket | क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होणार ब्रेट ली

क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होणार ब्रेट ली

सिडनी : आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली बिग बॅश लीग (बीबीएल)नंतर क्रिकेटच्या संपूर्ण प्रकारांतून निवृत्त होणार आहे़ अशा प्रकारे त्याच्या २० वर्षांच्या गौरवशाली क्रिकेट कारकिर्दीचा समारोप होईल़
या ३८ वर्षीय वेगवान गोलंदाजाने जुलै २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती़ मात्र, यानंतर त्याने इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल) आणि बीबीएलमध्ये खेळणे सुरूच ठेवले होते़ मात्र, आता तो या स्पर्धांमधूनही निवृत्ती घेणार आहे़
बीबीएलमध्ये सिडनी थंडरविरुद्धच्या गुरुवारी होणाऱ्या लढतीत तो अखेरच्या वेळी सिडनी सिक्सर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे़ सिक्सर्स संघ जिंकला, तर ली याला आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळेल़

Web Title: Brett Lee will be retiring from all forms of cricket