शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या धावांना ब्रेक

By admin | Updated: October 24, 2015 02:52 IST

अष्टपैलू अभिषेक नायरने मोक्याच्यावेळी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी यजमान बडोदासमोर ४४७ धावा उभारल्या

वडोदरा : अष्टपैलू अभिषेक नायरने मोक्याच्यावेळी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी यजमान बडोदासमोर ४४७ धावा उभारल्या. पहिल्या दिवशी दिडशतक झळकारवणारा श्रेयश अय्यर आणि अर्धशतकवीर सुर्यकुमार यादव हे नाबाद फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर नायरने एकाकी किल्ला लढवला. यानंतर यजमानांनी सावध सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेर एक बाद १३३ धावा अशी मजल मारली. बडोदा अद्यापही ३१४ धावांनी पिछाडीवर आहे.पहिल्या दिवसाची श्रेयश आणि सुर्यकुमार यांची खेळी पाहून त्यांच्याकडून अनुक्रमे द्विशतक आणि शतकाची अपेक्षा होती. मात्र श्रेयश सलग दुसरे द्विशतक झळकावण्यात अपयशी ठरला. ३ बाद ३१७ या धावसंख्येवरुन सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम श्रेयश बाद झाला. तो आपल्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ ६ धावांची भर काढून परतला. तर यानंतर लगेच सुर्यकुमारही वैयक्तिक धावसंख्येत केवळ २ धावांची भर घालून ६८ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे यानंतर कर्णधार आदित्य तरे, सिध्देश लाड आणि अभिषेक राऊतही लगेच बाद झाल्याने मुंबईची ३ बाद ३१७ धावसंख्येवरुन ८ बाद ३२७ अशी अवस्था झाली.यावेळी एकाबाजूने खंबीरपणे उभा राहिलेल्या नायरने संयमी खेळी करुन मुंबईला चारशेचा टप्पा पार करुन दिला. शार्दुल ठाकूरने त्याला निर्णायक सात देऊन ३१ चेंडूत ४ चौकारांसह २४ धावांची खेळी केली. नायर १२१ चेंडूत १४ चौकार व एक षटकार खेचून ८९ धावांची उपयुक्त खेळी करुन माघारी परतला. अजितेश अरगळने सर्वाधिक ४ बळी घेत मुंबईला धक्के दिले. तर सागर मंगळोरकर (१), हार्दिक पांड्या (२) आणि युसुफ पठाण (१) यांनीही चांगला मारा केली.बडोदाने फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर त्यांना २० धावसंख्येवर पहिला धक्का बसला. धवल कुलकर्णीने सलामीवीर मोनिल पटेलला बाद केले. मात्र नंतर केदार देवधर आणि कर्णधार आदित्य वाघमोडे यांनी नाबाद ११३ धावांची भागीदारी करुन बडोदाला सावरले. देवधर नाबाद ८४ धावांसह खेळपट्टीवर टिकून आहे. तर वाघमोडेही नाबाद ३५ धावांची खेळी करुन देवधरला साथ देत आहे.धावफलकमुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. हूडा गो. पांड्या ६७, धवल कुलकर्णी त्रि. गो. अरगळ ३, श्रीदीप मांगेला पायचीत गो. मंगलोरकर ११, श्रेयश अय्यर धावबाद (पठाण) १७३, सुर्यकुमार यादव झे. शाह गो. अरगळ ६८, आदित्य तरे झे. पठाण गो. पांड्या १, सिध्देश लाड झे. शाह गो. अरगळ ०, अभिषेक नायर झे. वाघमोडे गो. पठाण ८९, अभिषेक राऊत झे. मंगलोरकर गो. अरगळ ०, शार्दुल ठाकुर धावबाद (पटेल) २४, विशाल दाभोळकर नाबाद ५. अवांतर - ६. एकूण : १२७.१ षटकांत सर्व बाद ४४७ धावा.गोलंदाजी : मुर्तुजा वोहरा २६-३-९५-०; सागर मंगलोरकर १८-१-७६-१; अजितेश अरगळ २५-९-६७-४; हार्दिक पांड्या २२-११-५०-२; दीपक हुडा ७-१-२३-०; स्वप्निल सिंग १९-१-९४-०; युसूफ पठाण ९.१-१-३४-१; आदित्य वाघमोडे १-०-३-०.बडोदा (पहिला डाव) : केदार देवधर खेळत आहे ८४, मोनिल पटेल झे. यादव गो. कुलकर्णी १०, आदित्य वाघमोडे खेळत आहे ३५. अवांतर - ४. एकूण : ४५ षटकांत १ बाद १३३ धावा.गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ११-०४४-०; धवल कुलकर्णी ११-२- ३१-१; अभिषेक नायर ९-२-१४-०; विशाल दाभोळकर ८-३-२१-०; अभिषेक राऊत ६-०-१९-०.