शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
6
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
7
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
8
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
9
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
10
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
11
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
12
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
13
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
14
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
15
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
16
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
17
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
18
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
19
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
20
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

बॉडी बिल्डिंग संघटनेचा पर्दाफाश

By admin | Updated: October 9, 2015 04:52 IST

बनावट कागदपत्राद्वारे शरीरसौष्ठव संघटना स्थापन करणे, सरकारकडून अनुदान लाटणे व खेळाडूंचा विश्वासघात केल्याच्या आरोपावरून इंडियन बॉडी बिल्डर फेडरशेनच्या पदाधिकाऱ्यांसह

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली
बनावट कागदपत्राद्वारे शरीरसौष्ठव संघटना स्थापन करणे, सरकारकडून अनुदान लाटणे व खेळाडूंचा विश्वासघात केल्याच्या आरोपावरून इंडियन बॉडी बिल्डर फेडरशेनच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडा मंत्रालयाचे संयुक्त सचिव ओंकार केडिया यांच्या विरोधात पार्लमेंट रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी माहिती देताना इंडियन बॉडी बिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनचे (औरंगाबाद) महासचिव संजय मोरे म्हणाले, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणतीही पडताळणी न करता १९ जुलै २०१२ रोजी मान्यता दिली. संघटनेने सादर केलेल्या कागदपत्रांची कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही. केंद्रीय मंत्रालयाच्या मान्यतेमुळे या संघटनेला भारतासह जगभरात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांना सरकारकडून अनुदान देखील देण्यात आले. इतकेच काय तर संघटनेच्या माध्यमातून काही खेळाडूंना रल्वे सहीत विविध ठिकाणी नोकरी देखील मिळाली आहे.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबई व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन नावाच्या दोन वेगवेगळ््या संघटना आहेत. त्यांचे संचालक म्हणून मुंबईचे चेतन पठारे व हरियाणाचे के अमित स्वामी आहेत.
त्यांनी केंद्रीय मंत्रालयाला खोटी कागदपत्रे सादर करून आमच्या संघटनांचे विलिनीकरण झाले असल्याचे सांगितले. मात्र मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांकडून
१३ मे २०१५ साली मिळालेल्या माहिती नुसार या दोन्ही संघटनांचे विलिनीकरण झालेले नाही. त्यामुळे नवीन संघटना आपोआपच
रद्द होत असल्याचे मोरे म्हणाले. तत्कालिन संयुक्त सचिवांशी हातमिळवणी करुन संघटनेला मान्यता घेण्यात आली. त्या वेळी क्रीडा मंत्री हणून अजय माकन हे होते, असेही ते म्हणाले.

क्रीडा मंत्रालयाची सापत्न वागणूक
इंडियन बॉडी बिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशन या संघटनेला इंडियन आॅलिम्पिक असोसिएशन, आशियाई क्रडा संघटना व वर्ल्ड अ‍ॅण्टी डोपिंग असोसिएशनकडून मान्यता मिळालेली आहे. असे असतानाही क्रीडा मंत्रालय मान्यता देत नाही, म्हणजे मंत्रालय एकप्रकारे सापत्न वागणूक देत आहे.

तत्कालीन क्रीडामंत्री अजय माकन यांनी इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन या संघटनेची शिफारस केली होती. त्या नुसारच त्या संघटनेला मान्यता देण्यात आली आहे.
- ओंकार केडिया,
संयुक्त क्रीडा सचिव