शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 9:40 PM

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पराभवानंतर नेत्यांची तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) घर वापसी सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीमध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत. टीएमसीमध्ये सामील होण्यासाठी गंगाजल शिंपडून भाजप कार्यकर्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. (BJP workers were now taken back to TMC after purifying them by gangajal in West bengal)

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. भाजप कार्यकर्त्यांचे हे उपोषण जवळपास 4 तास चालले.

तब्बल चार तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. यानंतर संबंधित भागातील टीएमसी पंचायत प्रमुखांनी या सर्व कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना 'शुद्ध' केले. यानंतर त्यांना पुन्हा पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. यासाठीही भाजप कार्यकर्ते उत्साहात दिसत होते. विशेष म्हणजे या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, की जोवर आम्हाला टीएमसीत प्रवेश मिळत नाही, तोवर आम्ही हे उपोषण सुरूच ठेऊ. महत्वाचे म्हणजे, भाजपतील केवळ छोटे कार्यकर्तेच नाही, तर मोठे कार्यकर्तेही याच रांगेत दिसत आहेत.

नंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष 

बीरभूम येथे काही दिवसांपूर्वीही टीएमसीमध्ये सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. पश्चिम बंगालमध्ये हा नवा ट्रेंडच सध्या सुरू झाला आहे.

असं आहे भाजपचं उत्तर?या नव्या ट्रेंडवर बोलताना भाजपने आरोप केला आहे, की निवडणुकीनंतर जो हिंसाचार झाला, त्याला घाबरून भाजपतील हे कार्यकर्ते आता पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे, की आता भाजप कार्यकर्त्यांकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. कारण ज्या प्रकारचा हिंसाचार सुरू आहे, तो अभूतपूर्व आहे. भाजपला धक्क्यावर धक्के -भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मुकुल रॉय यांनी पुत्र शुभ्रांसू सोबत नुकता टीएमसीत प्रेवेश केला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत 11 जूनला पुन्हा टीएमसीत प्रवेश केला. 

धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप 

टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा