शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे महाराष्ट्राची पीछेहाट

By admin | Updated: July 18, 2014 02:32 IST

सध्या कबड्डीत होत असलेल्या महाराष्ट्राच्या पीछेहाटीला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असून, अशा खेळाडूंवर व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता लावली जाईल

मुंबई : सध्या कबड्डीत होत असलेल्या महाराष्ट्राच्या पीछेहाटीला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असून, अशा खेळाडूंवर व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता लावली जाईल, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘कबड्डी दिना’निमित्त परखडपणे सुनावले. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त नुकताच तुळजापूर येथे कबड्डी दिन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटील बोलत होते. सध्या कबड्डीचे सामने मॅटवर घेणे अनिवार्य झाल्याने किशोर व कुमार गटातील खेळाडूंना जास्तीतजास्त मॅटवर सराव दिला पाहिजे. जेणेकरून मॅटवर आपण कोठे कमी पडतो हे कळेल व भविष्यात खुल्या गटासाठी महाराष्ट्राला अधिक खेळाडू लाभतील, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.‘सर्कल कबड्डी’ हा कबड्डीचा नवीन प्रकार जाणून घेऊन त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे किनारपट्टी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या बीच कबड्डी प्रकारातदेखील महाराष्ट्राने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगताना पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला कबड्डीतील गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे मतदेखील मांडले.दरम्यान, या वेळी दिवंगत बाबाजी जामसांडेकर, दिवंगत मुकुंद जाधव व कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ कुमार व किशोर गटातील प्रत्येकी आठ अशा एकूण १६ खेळाडूंना ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सांगलीच्या काशिलींग आडके याला मधू पाटील स्मृती पुरस्कार तर मुंबई उपनगरच्या अभिलाषा म्हात्रे हिला अरुणा साटम स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाय यंदाच्या मोसमात राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद गुण मिळवणाऱ्या मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ‘लोकमत’ (परभणी)चे जेष्ठ क्रीडा पत्रकार माधव शेजूळ यांचादेखील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)