शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय अधिकारी द्विधा मनस्थितीत

By admin | Updated: December 6, 2015 23:30 IST

बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी एप्रिल २०१४ मध्ये पीसीबीला लिहिलेल्या पत्रामुळे बोर्ड अडचणीत आले आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी एप्रिल २०१४ मध्ये पीसीबीला लिहिलेल्या पत्रामुळे बोर्ड अडचणीत आले आहे. या पत्रामुळे भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळण्यास प्रतिबद्ध आहे. त्यामुळे बीसीसीआयचे विद्यमान अधिकारी दुविधेत अडकले आहेत. या पत्रानुसार बीसीसीआयने डिसेंबर २०१५मध्ये यूएई किंवा अन्य स्थळावर पाकिस्तानसोबत दोन कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास प्रतिबद्धता दर्शवली आहे. ९ एप्रिलला लिहिलेल्या या पत्रात बीसीसीआयने आयसीसीच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या नवीन वित्तीय मॉडेल आणि आयसीसीच्या नियमांनुसार सामने खेळण्यास प्रतिबद्धता दर्शवली होती. आयसीसीच्या संचलनाच्या नियमानुसार श्रीनिवासन यांना वैश्विक संस्थेचे अध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी पीसीबीसह आशियाई देशांच्या समर्थनाची गरज होती. बीसीसीआयचे तत्कालीन सचिव संजय पटेल यांनी तेव्हा पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष नजम सेठी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय दौऱ्यांबाबत चर्चा आणि बैठकीनुसार बीसीसीआय आणि पीसीबी भारत-पाकिस्तान मालिकेबाबत सहमत आहे. निर्धारित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार ही मालिका घेण्यात येईल, असेही या पत्रात म्हटले होते. भारत-पाक मालिकेवरून त्या वेळी बीसीसीआयने म्हटले होते की, संभावित तारखांच्या उपलब्धतेनुसार नोव्हेंबर २०१४ मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात पाकिस्तानच्या संक्षिप्त दौऱ्यांसाठी प्रयत्न केले जातील. ही तारीख उलटून गेलेली असल्याने बीसीसीआय आणि केंद्र सरकारला दुविधेत अडकवले आहे. बीसीसीआय जर हा करार पूर्ण करत नाही, तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. हा दौरा दोन्ही देशांसाठी बंधनकारक आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे सरकारला या मालिकेसाठी परवानगी देण्यावर अडचण आहे. सरकारचे मत जाणून घेण्यासाठी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. सरकार निर्णय घेण्याआधी सर्व पर्यायांचा विचार करत आहे. विदेशमंत्री सुषमा स्वराज या पुढच्या आठवड्यात पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.