शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लॉर्ड्सवर फलंदाजीसाठी सज्ज!

By admin | Updated: July 16, 2014 16:30 IST

थंड आणि शांत अशा नॉटिंगहॅम शहरातून भारताचा संघ गजबजलेल्या लंडन शहरात आला. आक्रमक आणि चैतन्यदायी मूडशी समरस होत भारतीय संघाचे सोमवारी येथे आगमन झाले.

अजय नायडू, लंडनथंड आणि शांत अशा नॉटिंगहॅम शहरातून भारताचा संघ गजबजलेल्या लंडन शहरात आला. आक्रमक आणि चैतन्यदायी मूडशी समरस होत भारतीय संघाचे सोमवारी येथे आगमन झाले. संध्याकाळी युवराज सिंगच्या उपस्थितीत हॉटेल हिल्टन येथे विशेष प्रीतिभोजनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता संघाने सराव केला. संघातील एका खेळाडूवर अनेकांचे लक्ष आहे. तो म्हणजे विराट कोहली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडूनही त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कारण विराटचा हा पहिलाच इंग्लंड कसोटी दौरा आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या गुरूवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. नेटमध्ये काही ‘हिट्स’ लगावल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. मी लॉर्ड्सवर उतरण्यासाठी सज्ज आहे, असे विराट हसतमुखाने म्हणाला. लॉर्ड्सवरील इतिहास आणि परंपरेत प्रत्येक क्रिकेटर हरवलेला असतो. ही गोष्ट विराटसाठीसुद्धा लागू होते. कारण त्याचा हा इंग्लंडमधील पहिला कसोटी दौरा आहे. लॉर्ड्सवर खेळण्यासाठी मी उत्साही आहे. येथे खेळण्याबाबतचे काही ध्येय माझ्या मनात आहेत. एक क्रिकेटपटू म्हणून आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड येथे शतक झळकाविणे प्रत्येकासाठी अभिमानाचे असते. या यादीत इंग्लंडलासुद्धा अधिक प्राधान्य आहे.आपल्या तडफदार स्ट्रेक्स आणि शैलीने युवा फलंदाज विराटने क्रिकेटविश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे. २७ वर्षीय विराटने २५ आंतरराष्ट्रीय शतके झळकाविली असून, त्यात सहा कसोटी शतकांचा समावेश आहे.