शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंगची लढाई शेवटपर्यंत लढणार

By admin | Updated: August 18, 2016 01:21 IST

भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्याला जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे. कुस्ती महासंघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

रिओ : भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्याला जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे. कुस्ती महासंघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी ‘लोकमतला’ सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा गेम्स व्हिलेजमध्ये ब्रिजभूषण यांना नरसिंगच्या वाटचालीबद्दल विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, नाडाने जो अहवाल वाडाकडे पाठवायला हवा होता तो पाठविला नव्हता. त्यामुळे वाडाकडून निर्णय येण्यास उशीर झाला. वाडाची सुनावणी आज गुरुवारी होणार आहे. त्याच दिवशी नरसिंगचा निर्णय होईल. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची तयारी पूर्ण झाली. दिल्लीतील आमचे वकील जरी येथे येऊ शकले नसले तरी आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी येथील एक वकिलाची नेमणूक केली आहे. गरज भासल्यास दिल्लीतील आमचे वकील नाडा समिती समोर कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा मोबाईलवर बाजू मांडतील. आम्ही आयओसीलासुध्दा नरसिंगबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती करणार आहोत.’ आॅलिम्पिक सुरू होण्यापूर्वी आयओसीच्या बैठकीत रशियाच्या खेळाडूंबाबत जो निर्णय घेतला, तोच निर्णय नरसिंगच्याबाबत घ्यावा, अशी विनंती आयओसीला करणार आहोत, असे सांगून ब्रिजभूषण पुढे म्हणाले,‘ नरसिंगला स्पर्धेत सहभागी होऊ द्यायचे नसते तर आयओसीने त्याचे ओळखपत्र, त्याची गेम्स व्हिलेजमध्ये संघाबरोबर राहण्याची व्यवस्था, लॉटस्मध्ये त्याच्या नावाचा समावेश केलाच नसता. नरसिंगची बाजू मांडण्यासाठी आम्ही कोणतीच कसर शिल्लक ठेवणार नाही. त्याला योग्य न्याय मिळेल,असा मला विश्वास आहे. निर्णय आमच्या बाजूनेच लागेल, नरसिंह या स्पर्धेत खेळेल आणि भारताला नक्कीच पदक जिंकून देईन, असा विश्वास आहे.’ ‘भगवान के घर देर है, अंधेर नही’ असेही ब्रिजभूषण सांगायला विसरले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)