विराट कोहलीनंतर गावस्करांची अनुष्कासाठी बॅटींग

By Admin | Updated: March 29, 2016 16:51 IST2016-03-29T16:48:12+5:302016-03-29T16:51:25+5:30

विराट कोहलीने संताप व्यक्त केल्यानंतर आता भारताचे माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनीदेखील अनुष्काची बाजू मांडली आहे

Batting for Gavaskar's Anushka after Virat Kohli | विराट कोहलीनंतर गावस्करांची अनुष्कासाठी बॅटींग

विराट कोहलीनंतर गावस्करांची अनुष्कासाठी बॅटींग

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २९ - टी-20 वर्ल्ड कपमधील भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यातील विजयानंतर सोशल मिडियावर अनुष्काच्या नावाने सुरु असलेल्या जोक्सवरुन विराट कोहलीने संताप व्यक्त केल्यानंतर आता भारताचे माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनीदेखील अनुष्काची बाजू मांडली आहे. 'अनुष्का अत्यंत चांगली मुलगी असून तिने विराट कोहलीच्या आयुष्यावर क्रिकेटर म्हणून असो अथवा माणूस म्हणून सकारात्मक छाप सोडली आहे', असं सुनील गावस्कर बोलले आहेत. 
 
एनडीटीव्हीशी बोलताना सुनील गावस्कर यांनी हे मत व्यक्त केलं आहे. अनुष्कावर टीका करणा-यांनी सुनील गावस्करांनी 'निराश' म्हंटलं आहे. 'विराट आणि अनुष्का एकत्र खुप चांगले दिसतात. विराट जेव्हा एक बॅट्समन म्हणून उभा राहत होता तेव्हा अनुष्काने त्याला स्थिरता दिली असल्याचं', सुनील गावस्कर बोलले आहेत. 
 
विराट कोहलीनेदेखील सोशल मिडियावर सुरु असलेल्या या गोंधळावर आपला राग व्यक्त केला होता. 'अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा'. अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे असे टि्वट करुन विराटने उत्तर दिले होते.  
 

Web Title: Batting for Gavaskar's Anushka after Virat Kohli