बांगलादेश-आॅस्ट्रेलिया लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 02:22 IST2016-03-21T02:22:38+5:302016-03-21T02:22:38+5:30

स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा आॅस्ट्रेलिया आणि पाकविरुद्ध पराभवाला सामोरे जाणारा बांगलादेश या दोन्ही संघांपुढे आयसीसी टी-२० स्पर्धेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे.

Bangladesh-Australia match today | बांगलादेश-आॅस्ट्रेलिया लढत आज

बांगलादेश-आॅस्ट्रेलिया लढत आज

बंगळुरू : स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा आॅस्ट्रेलिया आणि पाकविरुद्ध पराभवाला सामोरे जाणारा बांगलादेश या दोन्ही संघांपुढे आयसीसी टी-२० स्पर्धेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे. उभय संघांदरम्यान सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ही लढत उभय संघांसाठी ‘करा अथवा मरा’ अशी आहे. या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात येणार आहे.
आॅस्ट्रेलियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण डेव्हिड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ यांच्यासह आघाडीच्या खेळाडूंना गेल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची बाजू मजबूत असून, सोमवारच्या लढतीत आघाडीच्या फळीकडून त्यांना चमकदार कामगिरीची आशा आहे.
चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरूसायंकाळी ७.३० पासून

Web Title: Bangladesh-Australia match today