शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरुचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे

By admin | Updated: May 16, 2016 05:00 IST

प्रो कबड्डीच्या लिलावामध्ये इतकी मोठी रक्कम मिळेल, याची काहीच कल्पना होती.

रोहित नाईक,

मुंबई- प्रो कबड्डीच्या लिलावामध्ये इतकी मोठी रक्कम मिळेल, याची काहीच कल्पना होती. सर्वाधिक किंमत मिळाल्याचा आनंद आहेच. मात्र, आता तेवढीच जबाबदारीही वाढली आहे. बंगळुरु बुल्सने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया प्रो कबड्डीतील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला स्टार डिफेंडर मोहित चिल्लरने ‘लोकमत’ला दिली. शुक्रवारी मुंबईत झालेल्या लिलावात बंगळुरु बुल्सने तब्बल ५३ लाखांची सर्वाधिक बोली लावून मोहितला आपल्या संघात घेतले.दिल्लीतील निजामपूर गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेला मोहित भारतीय रेल्वेत (उत्तर-पश्चिम) नोकरी करतो. काकांमुळे कबड्डीकडे वळाल्याचे सांगताना मोहितने सांगितले, ‘आम्ही एकूण सात चुलत भाऊ असून, सहा जण कबड्डीपटू आहेत, त्यातील तिघे प्रो कबड्डी खेळत आहेत, तसेच बाकीचे तिघेही खूप मेहनत घेत असून, लवकरच तेही या लीगमध्ये येतील.’ मोहित पुढे म्हणाला, ‘मी जास्तीत जास्त ३० -४० लाखांपर्यंत अपेक्षा केली होती. एक तर मी डिफेंडर असल्याने इतक्या मोठ्या किमतीचा विचारही केला नव्हता. मात्र, जे घडले ते धक्कादायक होते. सध्या डिफेन्स खूप महत्त्वाचे झाल्याने हा फरक पडला असेल.’भक्कम बचावाच्या जोरावर मोहित स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ यू मुंबाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. यापुढे मोहित बंगळुरुकडून खेळेल. याबाबत त्याने सांगितले, ‘ज्यांच्याबरोबर नेहमी खेळतो, त्यांच्यासोबतच आता पुढेही प्रो कबड्डीत खेळणार आहे, पण एक संंघ म्हणून थोडासा फरक निश्चितच पडेल. शेवटी हा खेळाचा एक भाग असल्याने सर्व विसरून खेळावेच लागणार.’