शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा पराभव करत बॅँगलोरची प्लेऑफमध्ये धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 23:19 IST

कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने दिलेले १३९ धावांचे आव्हान १९ व्या षटकात ६ राखून बॅँगलोरने सहज पार करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. २२ : कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने दिलेले १३९ धावांचे आव्हान १९ व्या षटकात ६ राखून बॅँगलोरने सहज पार करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. कोहलीने ४५ चेंडूत ५४ धावांची नाबद मॅच विनिगं खेळी केली. तर के राहूल याने मधल्या फळीत दर्जेदार फलंदाजी करताना २३ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. गेल १, डिव्हिलर ६, वॅटसन १४ हे आपल्या लौकिकास साजेशी खळी करण्यात अपयशी ठरले. बिन्नीने नाबाद १६ धावांचे योगदान दिले.  
त्यापुर्वी,  युजवेंद्र चहलच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने ‘करा अथवा मरा’ या लढतीत क्विंटन डिकॉकच्या अर्धशतकी खेळीनंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्सला ८ बाद १३८ या धावसंख्येवर रोखले.
 
चहलने ३२ धावांत ३ गडी बाद केले. त्यामुळे दिल्ली संघाने नियमित अंतराने त्यांचे फलंदाज गमावले. ख्रिस गेलनेदेखील ११ धावांत २ गडी बाद केले. दिल्लीकडून सलामीवीर डिकॉकने ५ चौकार व एका षटकारासह ५० चेंडूंत ६० धावांची खेळी केली; परंतु अन्य फलंदाज मोठे योगदान देऊ शकले नाहीत. अखेरीस ख्रिस मॉरिसने १८ चेंडूंत नाबाद २७ धावा करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
 
नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली नाही, ऋषभ पंत फक्त एका धावेवर श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर  बाद झाला. विशेष म्हणजे अरविंदच्या गोलंदाजीवर सलामीवीर डिकॉकदेखील सुदैवी ठरला. डिकॉकने नंतर अरविंदच्या पुढच्या षटकात षटकार व चौकार मारला. करुण नायर (११) यानेदेखील शेन वॉटसनला षटकार ठोकला; परंतु लेगस्पिनर चहलच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने मागे धावत जाताना त्याचा शानदार झेल टिपला. दिल्लीला पॉवरप्लेमध्ये २ बाद ४३ धावाच करता आल्या. संजू सॅमसन (१७) याने चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्या षटकातही चौकार मारला; परंतु याच गोलंदाजाच्या पुढच्या चेंडूवर तो राहुलच्या हाती झेल देऊन बसला.