शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

सय्यद मोदी बॅडमिंटन : अरुंधती पानतावणेची आगेकूच

सय्यद मोदी बॅडमिंटन : अरुंधती पानतावणेची आगेकूच
सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
लखनौ : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू व अव्वल मानांकित सायना नेहवालसह दुसरे मानांकन प्राप्त स्पेनची कॅरोलिन मारिस व तिसरे मानांकन प्राप्त पी.व्ही. सिंधू यांनी आज सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
लखनौ बीबीडी बॅडमिंटन अकादमीमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत पुरुष विभागात अव्वल मानांकित श्रीकांत व पारुपल्ली कश्यप यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय खेळाडूंनी आज वर्चस्व गाजविले. बिगरमानांकित अरुंधती पानतावणेने पाचव्या मानांकित स्पेनच्या बीट्रिज किरालिसचा २२-२०, २२-२० ने पराभव करीत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीमध्ये बिगरमानांकित भारतीय जोडी मन्नू अत्री व मनीषा यांनी दुसऱ्या मानांकित सिंगापूरच्या डेनी बावा क्रिसनाटा व यु यान वरीना यांचा २३-२१, २१-१९ ने पराभव केला. उपउपांत्यपूर्व फेरीत अव्वल मनांकित सायना नेहवालने रितुपर्णा दासचा २१-१५, २१-१९ ने तर दुसऱ्या मानांकित स्पेनच्या कॅरोनिल मारिनने संघर्षपूर्ण लढतीत तन्वी लाडचा २१-२३, २१-१९, २१-६ ने पराभव केला. तिसऱ्या मानांकित पी.व्ही. सिंधूने सिंगापूरच्या जियायुवान चेनचा २१-१८, २१-१४ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)