शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी चेंडूवर पहिले त्रिशतक ठोकण्याचा मान अझर अलीला

By admin | Updated: October 15, 2016 01:30 IST

सलामीवीर अजहर अली (नाबाद ३0२) याचे गुलाबी चेंडूवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यातील विक्रमी पहिले त्रिशतक आणि शमी असलम (९0) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी केलेल्या

दुबई : सलामीवीर अजहर अली (नाबाद ३0२) याचे गुलाबी चेंडूवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यातील विक्रमी पहिले त्रिशतक आणि शमी असलम (९0) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी केलेल्या २१५ धावांच्या भागीदारीच्या बळावर पाकिस्तानने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिला डाव ३ बाद ५७९ धावांवर घोषित केला.अजहरने चौकार मारत त्रिशतक ठोकल्याबरोबरच कर्णधार मिसबाह उल हक याने पाकिस्तानचा डाव घोषित केला. अजहरने ४६९ चेंडूंत २३ चौकार व २ षटकारासह नाबाद ३0२ धावांची विक्रमी खेळी केली. दिवस-रात्र गुलाबी चेंडूंवर खेळवल्या जाणाऱ्या कसोटीत त्रिशतक ठोकणारा अजहर पहिला फलंदाज ठरला. त्याचप्रमाणे अजहर हा हनीफ मोहम्मद, इंजमामुल हक आणि युनूस खाननंतर त्रिशतक ठोकणारा पाकिस्तानचा चौथा फलंदाज ठरला.पाकिस्तानने कालच्या १ बाद २७९ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अजहर अली १३६ आणि असद शफिक ३३ धावांवर नाबाद होते. आपल्या ४00 व्या कसोटीत पाकिस्तानने सकाळी आपली स्थिती २ बाद ३९१ पर्यंत पोहोचवली. शफिक या सत्रात ६७ धावा केल्यानंतर देवेंद्र बिशूच्या हाती झेल देऊन बाद झाला.सकाळच्या दोन तासांच्या खेळानंतर शफिकने शॅनन गॅब्रियल याला सलग दोन चौकार मारत द्विशतक पूर्ण केले. त्याने याच षटकात चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन पाकिस्तानच्या ४00 धावाही पूर्ण केल्या. अजहरने तिसऱ्या सत्रात त्रिशतक पूर्ण केले आणि तो पाकिस्तानचा नवा इतिहास पुरुष बनला.असद शफिकने ६७, बाबर आजम याने ६९ व मिसबाहने नाबाद २९ धावा करीत त्याला साथ दिली.