ऑस्ट्रेलिया, भारत पहिली कसोटी रद्द होण्याची शक्यता

By Admin | Updated: November 28, 2014 01:25 IST2014-11-28T01:25:19+5:302014-11-28T01:25:19+5:30

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याचे डोक्याला चेंडू लागून निधन झाल्यामुळे क्रीडा जगतात हळहळ व्यक्त केली जात आह़े

Australia, India are likely to get rid of the first Test | ऑस्ट्रेलिया, भारत पहिली कसोटी रद्द होण्याची शक्यता

ऑस्ट्रेलिया, भारत पहिली कसोटी रद्द होण्याची शक्यता

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याचे डोक्याला चेंडू लागून निधन झाल्यामुळे क्रीडा जगतात हळहळ व्यक्त केली जात आह़े त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 डिसेंबरपासून होणारा पहिला कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता आह़े 
सिडनी क्रिकेट मैदानावर डोक्याला बाऊं सर लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 25 वर्षीय फिल ह्युजने गुरुवारी जगाचा निरोप घेतला़ या स्टार खेळाडूचे निधन झाल्याचे वृत्त येताच माजी क्रिकेटपटूंनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी रद्द करण्याची मागणी केली आह़े 
भारत-सीए एकादश सराव सामना रद्द 
भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) या संघात शुक्रवारपासून सुरू होणारा दोन दिवसीय सराव सामना रद्द करण्यात आला आह़े  (वृत्तसंस्था)
 
 
 

 

Web Title: Australia, India are likely to get rid of the first Test