शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत

By admin | Updated: January 24, 2015 01:33 IST

आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करीत तिरंगी वन-डे सामन्यांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

होबार्ट : स्टिव्हन स्मिथने (नाबाद १०२) प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करीत तिरंगी वन-डे सामन्यांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा कर्णधार इयान बेलची (१४१) शतकी खेळी व्यर्थ ठरली. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथने ९५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०२ धावा फटकाविल्या. त्यात ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा ४९.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. स्मिथच्या शतकी खेळीमुळे बेलच्या १४१ धावांच्या खेळीवर पाणी फेरल्या गेले. बेलने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली, पण पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अखेर ती व्यर्थच ठरली. आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या डावात बेल व्यतिरिक्त जो रुट (६९) व मोईन अली (४६) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. इंग्लंडने ५० षटकांत ८ बाद ३०३ धावांची दमदार मजल मारली. अ‍ॅरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर स्मिथने ग्लेन मॅक्सवेलसोबत (३७) चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची, जेम्स फॉकनरसोबत (३५) पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची तर ब्रॅड हॅडिनसोबत (४२) सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अखेरच्या क्षणी हॅडिन व मोएजेस हन्रिक्स (४) बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, अखेर आॅस्ट्रेलियाने विजय निश्चित करत अंतिम फेरीत स्थान पक्के केले. (वृत्तसंस्था)