शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

फाॅर्म्युला १ चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणारा अथर्व; पहिला मराठमाेळा फाॅर्म्युला कार रेसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:54 IST

अथर्वने ‘लाेकमत’शी बाेलताना त्याच्या स्वप्नाविषयी सांगितले. ताे म्हणताे, मला फाॅर्म्युला १ शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

तरुणाईला एका गाेष्टीचे माेठे आकर्षण असते, ते म्हणजे वेग! या वेगावर स्वार हाेऊन एक मराठमाेळा तरुण फाॅर्म्युला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पाहात आहे. त्याचे नाव आहे अथर्व देसाई. वयाच्या सातव्यावर्षीच ताे वेगाशी स्पर्धा करू लागला. सर्वप्रथम २००८ मध्ये गाे-कार्टद्वारे या अथर्व रेसिंग ट्रॅकवर उतरला. तेव्हापासून त्याने या प्रकारातील अनेक शर्यती जिंकल्या आहेत. आता त्याची नजर भारतात यावर्षाअखेरीस हाेणाऱ्या फाॅर्म्युला शर्यतींवर आहे.अथर्वने ‘लाेकमत’शी बाेलताना त्याच्या स्वप्नाविषयी सांगितले. ताे म्हणताे, मला फाॅर्म्युला १ शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राची माती शाैर्य आणि त्यागासाठी ओळखली जाते. माझी पाळेमुळे या मातीतच रुजली असल्याने मला चॅम्पियनशिप जिंकून देशाचा गाैरव वाढविण्यासाठी प्रेरणा मिळत राहते.अथर्वला पहिल्या एफआयए चॅम्पियनशिपसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा फाॅर्म्युला रिजनल युराेप अणि अमेरिकेशी समतुल्य आहे. बुद्ध इंटरनॅशनल सर्किटपासून नाेव्हेंबर महिन्यात स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. त्यानंतर हैदराबाद, चेन्नई आणि काेईम्बतूर या शहरांमध्ये स्पर्धेचे वेगवेगळे टप्पे पार पडणार आहेत. अथर्व त्यात सहभागी हाेण्याची शक्यता आहे.

अल्पावधीतच माेठे यशगाे-कार्टींगनंतर अथर्वने २०१७ मध्ये फाॅर्म्युला ४ प्रकारांत पाऊल ठेवले. त्यानंतर फाॅर्म्युला ३ या प्रकारात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच अथर्वने माेठे यश मिळविले. त्याची ‘यंग रेसिंग ड्रायव्हर अकॅडमी’मध्ये निवड झाली असून, तेथे ताे प्रशिक्षण घेत आहेत.फाॅर्म्युला १ रेसिंगचे स्वप्न उराशी बाळगल्यानंतर अथर्व आता ऑक्सफाेर्ड येथे माेटरस्पाेर्ट टेक्नाॅलाॅजीमध्ये अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे.