शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

By admin | Updated: March 4, 2015 23:59 IST

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते.

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते. खेळपट्टीचा इतिहास बघितल्यानंतर ही भीती स्वाभाविक होती, पण त्यानंतर वेस्ट इंडीज संघ मैदानावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. आता तर या संघाचा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करावा की नको, असा प्रश्न पडतो. विंडीजने पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि याची मला कल्पना आहे, तरी विंडीजच्या तुलनेत भारत अधिक मजबूत संघ आहे. तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या तुलनेत विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ वेगळा भासत आहे. धवनला सूर गवसला, हे याचे कारण असू शकते, पण त्यापेक्षा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी लय सापडली आहे. यूएईविरुद्धच्या सामन्याच्या निकालावरून आकलन करणे चुकीचे असले, तरी त्या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विंडीजविरुद्धच्या लढतीत उमेश यादव व मोहम्मद शमी सुरुवातीला बळी घेण्यात यशस्वी ठरले, तर विंडीज संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसेल. विंडीज संघाचे तळाचे फलंदाज धोकादायक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर सिमन्स, सॅमी, रसेल व होल्डर यांना नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर भारतीय संघाचा मार्ग खडतर होणे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ख्रिस गेलला लवकर बाद करणे महत्त्वाचे आहे. या लढतीत भारतीय फिरकीपटूंना लवकर गोलंदाजीची संधी मिळाली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. भारतीय फिरकीपटू येथे कमाल करू शकतात. कारण, अश्विन जबरदस्त फॉर्मात असून, कठीण प्रसंगी गोलंदाजी करणे त्याला आवडते. आयपीएलमध्ये गेलविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पर्थमध्ये यूएईविरुद्ध खेळणे फायद्याचे ठरले. त्या लढतीत रोहित शर्माला सूर गवसला. रोहितला क्रिकेटजगतात दिग्गज फलंदाज मानले जाते. जर, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर विंडीज संघाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणे निश्चित आहे. कारण विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू आता पूर्वीप्रमाणे दमदार नाही. सॅमी व रसेल यांनाही या संघांत १०-१० षटके गोलंदाजी करावी लागते, यावरून त्याची कल्पना येते. उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीपासून भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल; पण विंडीज संघाची गोलंदाजी भारतीय संघाची झोप उडवणारी नाही, हे मात्र नक्की. भारताच्या दृष्टीने विचार करता या सामन्यांचा सर्वोत्तम निकाल म्हणजे विजय असेल. टीम इंडिया या लढतीत गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. या लढतीच्या निमित्ताने टीम इंडियाला बाद फेरीची तयारी करण्याची चांगली संधी लाभली आहे. (टीसीएम)