शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

कारभार चालविण्यासाठी समिती नेमणार

By admin | Updated: June 17, 2016 05:23 IST

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या समितीकडे जीसीएचा कारभार दिला जाईल. जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांना आर्थिक गुन्हे विभागाने ३.१३ कोटी रुपयांची अफरातफर प्रकरणात बुधवारी अटक केली आहे.या कारवाईनंतर जीसीएचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी बीसीसीआयने खबरदारी घेतली आहे. कारभारासाठी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी जाहीर केले आहे. क्रिकेट व क्रिकेटपटूंच्या हिताची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. क्रिकेट व क्रिकेटपटूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे शिर्के यांनी माध्यमांना सांगितले.जीसीएच्या घोटाळे आणि इतर वादानंतर जीसीएचे बीसीसीआयमधील सदस्यत्व रद्द करण्याची शक्यता शिर्के यांनी फेटाळली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्त असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)त्रिकुटाला एक दिवस कोठडीजीसीएच्या बुधवारी अटक केलेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी गुरुवारी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. संशयितांना न्यायदानाच्या ठिकाणी उपस्थित न करता त्यांना न्यायाधीशांच्या कचेरीत उपस्थित करण्यात आले. तेथून मुल्ला यांना गोमेकॉत (गोवा मेडिकल कॉलेज), तर चेतन व बाळू यांना पणजी पोलिसांच्या कोठडीत नेण्यात आले. पोलिसांना हवी इतिवृत्ताची वही : जीसीएच्या इतिवृत्ताची वही पोलिसांना हवी असून ती मिळविण्यासाठी तिन्ही संशयितांची कोठडीतील चौकशी महत्त्वाची आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या वहीची माहिती संशयित देत नसल्याचा दावा त्यांनी केला. इतिवृत्ताची वही गायब झाल्याची तक्रार यापूर्वी जीसीएचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी केली होती. अध्यक्ष, सचीव व खजिनदार यांना अटक करण्याची ही पहिली वेळ आहे. जीसीएत जी अंधाधुंदी चालू आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि पूर्ण चौकशी होऊन प्रकरणाचा छडा लागेपर्यंत सरकारने प्रशासक नेमून जीसीएचा कारभार हाताळावा. विस्कटलेली घडी व्यवस्थित झाल्यानंतर नव्याने निवडणूक घेऊन नवीन समितीकडे जीसीए सोपवावी अशी मागणी जीसीएचे आजीव सदस्य डॉ शेखर साळकर यांनी केली आहे.जामीनसाठी धावतिन्ही संशयितांकडून जामीनसाठी अर्ज केले आहेत. जामीनवर शुक्रवारी दुपारी पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होईल. तसेच शुक्रवारी त्यांची कोठडीची मूदत संपत असल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीसाठी पोलीस पुन्हा प्रयत्न करतील. अकबर मुल्ला याचा रमजानचा उपवास सुरू असल्यामुळे त्याला कोठडीत ठेवले नाही. त्याला सध्या गोमेकॉत दाखल केले आहे.