शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का माझी शक्ती : विराट कोहली

By admin | Updated: April 15, 2015 01:37 IST

क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे.

बंगळुरू : क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे आहे. टीकाकारांचे लक्ष्य ठरल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या प्रेमिकेचे समर्थन केले आहे. अनुष्काची सोबत मला आवडत असून ती माझी शक्ती आहे, असे विराट म्हणाला.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितले की, ‘अनुष्कासोबत माझे नाते विशेष आहे. विश्वकप स्पर्धेनंतर हे नाते अधिक घट्ट झाले. आमच्या दोघांमधील प्रेम आणखी वृद्धिंगत झाले. माझ्या प्रेमाबाबत कुणी वाईट बोलले तर मला राग येणे स्वाभाविक आहे. कारण ते माझ्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे.’रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बसमधील या हायप्रोफाईल पेअरचे एकत्र छायचित्र सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय होत आहे. विराट पुढे म्हणाला,‘अनुष्का माझी शक्ती आहे. ज्या वेळी ती माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, त्या वेळी माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यानंतर मला विशेष आनंद मिळतो.’पत्रकारासोबत झालेल्या बाचाबाचीबाबत बोलताना विराट म्हणाला, ‘माझे कधी-कधी स्वत:वर नियंत्रण राहत नाही; पण कुणी जर माझ्या खासगी जीवनाबाबत उलटसुलट बोलत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे.’ विराट पुढे म्हणाला,‘बीसीसीआयची परवानगी मिळाल्यानंतर अनुष्का माझ्यासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती. मी शतक झळकावल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला टाळ्या वाजवताना बघून आनंद झाला. ती स्टेडियममध्ये उपस्थित असताना मी शतक ठोकले होते, याचा क्रिकेट चाहत्यांना विसर पडला. विश्वकप स्पर्धेत भारताच्या पराभवासाठी अनुष्काला जबाबदार धरण्यात येईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी माझे जीवन क्रिकेटला समर्पित केले आहे, याचा लोकांनी विचार करायला हवा. माझ्या हृदयाची स्पंदनं ‘इंडिया’साठी असतात आणि त्यामुळेच मैदानावर उतरल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याची माझ्या संघाला व अधिकाऱ्यांना चांगली कल्पना आहे. कुणापुढे हे सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.’ (वृत्तसंस्था) एखाद्याच्या खासगी आयुष्यात दुसरे हस्तक्षेप कसे करतात, याचे मला आश्चर्य वाटते. एखाद्याबाबत एवढे वाईट कसे काय बोलू शकतात. भारताच्या पराभवात अनुष्काची काय भूमिका आहे? ती उपस्थित असली म्हणजे मी मैदानावर सकारात्मक असतो; पण लोकांनी तिलाच लक्ष्य ठरवले, याचे आश्चर्य वाटले. विश्वकप स्पर्धेनंतर अनुष्का व माझे नाते अधिक घट्ट झाले. त्यानंतर आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची चांगली संधी मिळाली.- विराट कोहली