शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेकडेच प्रशिक्षकपदाची धुरा

By admin | Updated: June 12, 2017 20:50 IST

भारतीय संघामध्ये सध्या कप्तान विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कथित शीतयुद्ध सुरू आहे. मात्र असे असले तरी

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 12 -  भारतीय संघामध्ये सध्या कप्तान विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कथित शीतयुद्ध सुरू आहे. मात्र असे असले तरी भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे अनिल कुंबळेकडेच राहण्याची शक्यता आहे. कुंबळेची हरकत नसेल तर तोच वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आज सांगितले. 
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असून, विराट कोहली कुंबळेला प्रशिक्षकपदावरून हटवण्यासाठी  आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र विराटने मतभेदाच्या वृत्तांचे खंडन केले आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या सीओएच्या बैठकीनंतर विनोद राय म्हणाले, "प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सल्लागार समितीची आहे. गेल्यावर्षी त्यांनीच अनिल कुंबळेची एका वर्षासाठी प्रशिक्षक म्हणून निवड केली होता. आताही त्याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येणार आहे. पण प्रशिक्षक निवडण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला आहे. त्यामुळे कुंबळेची हरकत नसेल तर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्याच्याकडेच सोपवली जाईल,"
 सध्या सुरू असलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपल्यावर भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 23 जूनला खेळविण्यात येणार आहे.  दरम्यान, सल्लागार समितीमधील सदस्य अनिल कुंबळेला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे.