शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस संघटनेच्या मान्यतेसाठी अनिल खन्ना यांची माघार

By admin | Updated: November 4, 2016 04:14 IST

अनिल खन्ना यांनी गुरुवारी अखिल भारतीय टेनिस असोसिशएनच्या (एआयटीए) अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : अनुभवी क्रीडा प्रशासक अनिल खन्ना यांनी गुरुवारी अखिल भारतीय टेनिस असोसिशएनच्या (एआयटीए) अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सरकारसोबत वितुष्ट ओढवून घेतल्यामुळे खेळाचे नुकसान होईल तसेच टेनिस संघटनेला मान्यता मिळणार नाही, असे खन्ना यांनी म्हटले आहे.इंदूर येथे ३ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या एआयटीएच्या आमसभेत दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडण्यात आले होते. पुढील चार वर्षांसाठी त्यांची ही नियुक्ती होती; पण सरकारच्या क्रीडासंहितेनुसार दोन कार्यकाळांत किमान ‘चार वर्षांची विश्रांती’ या नियमांचा हवाला देत, त्यांनी नियम स्पष्ट होईपर्यंत पद स्वीकारण्यास नकार दिला होता. तथापि, ते एआयटीएचे आजीवन अध्यक्ष बनले होते.याआधी सलग दोनदा महासचिव राहिलेले खन्ना हे एआयटीएचे २०१२मध्ये अध्यक्ष बनताच क्रीडा मंत्रालय आणि एआयटीए यांच्यात बेबनाव सुरू झाला होता. सरकारचे मत असे, की अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी खन्ना यांनी मधली ४ वर्षे विश्रांती (कूलिंग आॅफ) घेतली नाही; पण एआयटीएचा युक्तिवाद असा, की खन्ना यांनी महासचिव म्हणून दुसऱ्यांदा निवडणूक लढविली नव्हती, शिवाय महासचिव राहिलेली व्यक्ती कूलिंग आॅफशिवाय अध्यक्ष बनू शकत नसल्याचा कुठलाही नियम अस्तित्वात नाही. मंत्रालय मात्र स्वत:च्या तर्कावर कायम आहे. याचा परिणाम म्हणून अलीकडे एआयटीएची मान्यता रद्द करण्यात आली. खन्ना हे आयटीएफचेदेखील उपाध्यक्ष आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ‘‘मी टेनिसचे नुकसान होण्यापेक्षा पदमुक्त होऊ इच्छितो. एआयटीएच्या नियमानुसार नव्याने अध्यक्षाची निवड करण्याची कार्यकारिणीला विनंती करीत आहे. मागच्या वर्षीदेखील तुम्ही असाच निर्णय घेतला होता; पण एआयटीएच्या कार्यकारिणीने पदावरून माघारीची परवानगी दिली नव्हती, असे विचारताच ते म्हणाले, ‘‘या वेळी मी आपल्या निर्णयावर ठाम असेन. खन्ना हे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे कोशध्यक्ष आहेत.’’ हा निर्णय दडपणाखाली घेतला काय, असे विचारताच खन्ना म्हणाले, ‘‘मी कुणाच्याही दडपणात नाही. एआयटीएने सरकारसोबत काम करावे, ही माझी इच्छा असल्याने हा निर्णय घेतला.’’ (वृत्तसंस्था) >या वेळी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. सर्व २३ राज्य संघटनांना विनंतीपत्र लिहिणार आहे. टेनिस संघटनेचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी मी माघार घेत आहे. सरकारसोबत भांडण विकत घेण्याची आमची मानसिकता नाही. अध्यक्ष आणि सचिव देशात नसतानादेखील टेनिस संघटनेचे कामकाज थांबत नाही. मी योग्य वेळी सल्ला देण्यास तयार आहे. - अनिल खन्ना, अध्यक्ष एआयटीए