शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाज अभिनव बिंद्राच्या जीवनपटात पितापुत्र अनिल-हर्षवर्धन एकत्र?

By admin | Updated: June 2, 2017 16:41 IST

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कारण अभिनव बिंद्रा यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची लवकर निर्मिती होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 -   ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कारण अभिनव बिंद्रा यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची लवकर निर्मिती होणार आहे. 
 
ही बातमी वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोठ्या पडद्यावर अभिनव बिंद्राची भूमिका कोण साकारणार बरे?... 
 
तुमची उत्सुकता अधिक काळ ताणून न ठेवता लगेचच उत्तर देतो... तर अभिनव बिंद्रा यांची भूमिका दुसरे तिसरे कुणी नाही तर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ""मिर्झिया"" सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारा हर्षवर्धन कपूर साकारणार आहे. 
 
या सिनेमाचे आणखी विशेष आकर्षण म्हणजे अभिनव यांच्या वडिलांची भूमिका अभिनेता अनिल कपूर साकारणार आहे. 
 
म्हणजे रिअल लाईफमधील पितापुत्राची जोडी आता रील लाईफमध्ये पितापुत्राची भूमिका साकारणार आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पिता-पुत्र अनिल कपूर व हर्षवर्धन कपूरनं हा सिनेमा साइन केला आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी अनिल कपूर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "सध्या सिनेमाबाबत कोणतेही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. सर्व गोष्टी अंतिम स्वरुपात ठरल्यानंतर मी याबाबत चर्चा करेन. हर्षवर्धनसोबत काम करण्यासाठी मी खूपच उत्साहीत आहे. मात्र आता यासंदर्भात काहीही बोलणं अयोग्य ठरेल".
 
अभिनव बिंद्रा यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा सिनेमा अभिनव आणि त्यांचे वडिलांसोबतचे संबंध यावर अधिक केंद्रीत असल्याची माहितीदेखील मिळत आहे. 
 
मुबारकामध्ये अनिल-अर्जुन एकत्र
तर दुसरीकडे आगामी सिनेमा ""मुबारका""मध्ये अनिल कपूर आणि त्यांचा पुतण्या अर्जुन कपूर एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी सिनेमा आहे. याबाबत सांगताना अनिल कपूर म्हणाले की, "मी आणि पुतण्या अर्जुन कपूर एकत्र दिसणार आहोत. माझी आई ""मुबारका"" सिनेमा पाहून अतिशय आनंदित होईल. कारण मुलगा आणि नातूला ती एकत्र पाहणार आहे." 
अनीस बज्मी दिग्दर्शित हा सिनेमा 28 जुलै रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.