शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

अमित मिश्राला अटक; जामिनावर सुटका

By admin | Updated: October 27, 2015 23:52 IST

गतमहिन्यात हॉटेलमधील रूममध्ये एका महिलेला मारहाण व शिवीगाळ गेल्याप्रकरणी मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी भारतीय फिरकीपटू अमित मिश्राला अटक केली

बंगळुरु : गतमहिन्यात हॉटेलमधील रूममध्ये एका महिलेला मारहाण व शिवीगाळ गेल्याप्रकरणी मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी भारतीय फिरकीपटू अमित मिश्राला अटक केली. यानंतर लगेच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
मागील महिन्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिश्राला समन्स दिले होते. त्यानुसार सात दिवसांमध्ये त्याला पोलिसांपुढे हजर राहण्यास सांगितले होते. या समन्सनुसार मिश्राने आपली उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे ज्यावेळी हे प्रकरण समोर आले तेव्हा पीडित महिलेने आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तिने असे केले नाही.
त्या महिलेने सांगितले होते, की मी पोलीस स्टेशनमध्ये मिश्राच्या येण्याच्या प्रतीक्षेत असून, आम्ही सहमतीने हे प्रकरण मिटवू. आमच्यामध्ये वाद झाला असला, तरीही आम्ही पूर्वीप्रमाणे मित्र आहोत. २७ नोव्हेंबरला या प्रकरणी तक्रार केलेल्या या महिलेने आपण मिश्राला ३ महिन्यांपासून ओळखत असल्याचा दावा केला होता. तसेच गतमहिन्यात भारतीय संघ सराव शिबिरासाठी बंगळुरु येथे ज्या हॉटेलमध्ये थांबलेला होता, त्याच हॉटेलच्या एका रूममध्ये ही घटना घडली होती, असेही त्या महिलेने सांगितले.
तक्रारीमध्ये म्हटले होते, की मिश्राच्या अनुपस्थितीमध्ये त्या महिलेने मिश्राच्या रूममध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी मिश्राही तेथे पोहोचल्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. महिलेने आरोप केला होता, की मिश्राने तिला मारहाण व शिवीगाळ केली. यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला होता. मिश्रा विरुद्ध ३५४ कलमांतर्गत विनयभंग आणि ३२३ आणि ३२४ अंतर्गत मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)