शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या गाडीचा पाठलाग करुन 'तिने' मिळवला सेल्फी

By admin | Updated: November 4, 2016 12:56 IST

न्यूझीलंडविरोधातील सामन्यासाठी रांचीमध्ये गेले असताना धोनीने आपल्या हमरने प्रवास केला होता. यावेळी आराध्याने धोनीला भेटण्याची चांगली संधी असल्याचं ओळखत स्कुटीवरुन त्याचा पाठलाग केला

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 4 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे करोडो चाहते आहेत. त्याला भेटायला मिळावं, त्याच्यासोबत एक फोटो काढायला मिळावा यासाठी धडपड करत असतात. धोनीच्या अशाच एका चाहतीने धोनीला भेटण्यासाठी चक्क स्कुटीवरुन त्याच्या गाडीचा पाठलाग केला. धोनीला भेटण्यासाठी तिने केलेला हा प्रयत्न वाया गेला नाही. धोनीने तिचं कौतुक करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. 
 
(धोनीची हमर कार पाहून न्युझीलंडचे खेळाडू चकित)
 
न्यूझीलंडविरोधातील सामन्यासाठी रांचीमध्ये गेले असताना धोनीने आपल्या हमर कारने प्रवास केला होता. यावेळी आराध्याने धोनीला भेटण्याची चांगली संधी असल्याचं ओळखत स्कुटीवरुन त्याचा पाठलाग केला. धोनीने आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठी तिने जोरजोरात धोनीचं नाव घेण्यास सुरुवात केली. धोनीचं लक्ष गेल्यावर त्याने सुरक्षारक्षकांना तिला सोडण्यास सांगितलं. धोनीने आराध्यासोबत सेल्फी काढण्यासही तयार झाला. यानंतर आराध्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. 
धोनी अत्यंत नम्र असून सेलिब्रेटी असल्याचा त्याला अजिबात गर्व नसल्याचा अनुभव आराध्याने प्रसारमाध्यमांसोबत शेअर केला. आराध्याप्रमाणे अनेकजण कोणाचे तरी चाहते असतात, त्यांना भेटायची आपलीदेखील इच्छा असते, पण तसा प्रयत्न करत नाही. आराध्याच्या या स्टोरीमुळे इतरांमध्येही थोडी आशा निर्माण झाली असेलच.