चौथ्या दिवसाखेर आफ्रिका २ बाद ७२

By Admin | Updated: December 6, 2015 16:41 IST2015-12-06T09:57:27+5:302015-12-06T16:41:06+5:30

भारताच्या ४८१ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने चौथ्या दिवसाखेर २ बाद ७२ धावा केल्या असून विजयासाठी त्यांना आणखी ४०९ धावांची गरज आहे.

After the fourth day, Africa 2 followed by 72 | चौथ्या दिवसाखेर आफ्रिका २ बाद ७२

चौथ्या दिवसाखेर आफ्रिका २ बाद ७२

ऑनलाईन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ६ - भारताच्या ४८१ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने चौथ्या दिवसाखेर २ बाद ७२ धावा केल्या असून विजयासाठी त्यांना आणखी ४०९ धावांची गरज आहे. कर्णधार हाशिम आमला (२३) व एबी डी व्हिलियर्स (११) खेळपट्टीवर आहेत. भारतातर्फे आर. अश्विनने एल्गर (४) आणि बवुमा (३४) या दोघांनाही बाद केले.

तत्पूर्वी अजिंक्य रहाणेने चौथ्या कसोटीच्या दुस-या डावातही शानदार शतक झळकवल्यानंतर भारताने २६७ धावांवर डाव घोषित केला आणि आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान ठेवले. एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो पाचवा खेळाडू आहे. दरम्यान चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर विराट कोहलीच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. भारताच्या डावाला आकार देणारा कर्णधार विराट कोहली (८८) धावांवर बाद झाला. त्याला अॅबॉटने पायचीत केले. त्यानंतर रहाणेने शतक झळकावत भारताला चांगली आघाडी मिळवून दिली. 

Web Title: After the fourth day, Africa 2 followed by 72