पराभवानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटले

By Admin | Updated: March 20, 2016 18:33 IST2016-03-20T18:13:33+5:302016-03-20T18:33:07+5:30

परंपरागत प्रतिस्पर्धी भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये काही जणांनी आपले टीव्ही संच फोडून राग व्यक्त केला.

After the defeat, TV fired in Pakistan | पराभवानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटले

पराभवानंतर पाकिस्तानात टीव्ही फुटले

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २० - परंपरागत प्रतिस्पर्धी भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पराभवानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी रस्त्यावर उतरुन आपला संताप व्यक्त केला. 
पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये काही जणांनी आपले टीव्ही संच फोडून राग व्यक्त केला. पाकिस्तानात या पराभवासाठी कर्णधार शाहीद आफ्रिदीला जबाबदार धरण्यात येत आहे. आफ्रिदीच्या चुकीच्या रणनितीमुळे पराभव झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. 
पाकिस्तानने दिलेले ११९ धावांचे लक्ष्य भारताने अगदी आरामात पार केले. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असताना स्पिनर इमाद वसिमला संघात स्थान न देण्याच्या आणि स्वत: वनडाऊन फलंदाजीला येण्याच्या अफ्रिदीच्या निर्णयावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेपटूंनी टिका केली आहे. 
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी तर अजब तर्क लावला आहे. इमरान खान यांनी जाणीवपूर्वक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना चुकीचा सल्ला दिला त्यामुळे पराभव झाल्याचे बासित अली यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: After the defeat, TV fired in Pakistan