द. आफ्रिका-आॅस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द

By Admin | Updated: June 21, 2016 02:04 IST2016-06-21T02:04:36+5:302016-06-21T02:04:36+5:30

आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेतील सामना केवळ ९ मिनिटांच्या खेळानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.

The Africa-Australia match canceled due to rain | द. आफ्रिका-आॅस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द

द. आफ्रिका-आॅस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द

ब्रिजटाऊन : आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेतील सामना केवळ ९ मिनिटांच्या खेळानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. उभय संघांना प्रत्येकी दोन गुण बहाल करण्यात आले.
नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने एका षटकात बिनबाद ८ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतरही बाह्यमैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. तिरंगी मालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या खात्यावर १२ गुणांची नोंद असून, आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर ११ गुण आहेत. सामना रद्द झाल्यामुळे विंडीज संघासाठी सुखावणारे वृत्त आहे. विंडीजच्या खात्यावर ८ गुणांची नोंद असून, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित दोनपैकी एका लढतीत विजय मिळवावा लागेल. (वृत्तसंस्था)

Web Title: The Africa-Australia match canceled due to rain