किंग्ज इलेव्हेन पंजाब समोर १५१ धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 27, 2015 21:35 IST2015-04-27T21:32:07+5:302015-04-27T21:35:18+5:30

२० षटकांत सहा गडी गमावत सनरायजर्स हैद्राबादने १५० धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकत किंग्ज इलेव्हेन पंजाबने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता

151 against Kings XI Punjab | किंग्ज इलेव्हेन पंजाब समोर १५१ धावांचे आव्हान

किंग्ज इलेव्हेन पंजाब समोर १५१ धावांचे आव्हान

>ऑानलाइन लोकमत
चंदिगढ, दि. २७ - २० षटकांत सहा गडी गमावत सनरायजर्स हैद्राबादने १५० धावा केल्या आहेत. 
नाणेफेक जिंकत किंग्ज इलेव्हेन पंजाबने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. डेव्हिड वॉर्नर वगळता एका ही खेळाडूला अर्धशतक गाठता आले नाही. तीन चौकार लगावत नमन ओझाच्या २६ चेंडूत २८ धावा झाल्या असताना अक्षर पटेलच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना डेव्हिड मिलरकडे झेल गेल्याने त्याला तंबूत परतावे लागले. सलामीला आलेला फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत एक षटकार व तब्बल १० चौकार लगावत ५८ धावा केल्या असताना अक्षर पटेलच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना डेव्हिड मिलरकडे झेल गेल्याने किंग्ज इलेव्हेन पंजाबच्या गोंलदाजांचा जीव भांड्यात पडला. सरते शेवटी आशीष रेड्डीने सरस खेळी करत आठ चेंडूत एक चौकार व व दोन षटकार लगावत २२ धावा केल्या. तर किंग्ज इलेव्हेन पंजाबच्या गोलंदाजांपैकी अक्षर पटेल व मिचेल जॉन्सन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर, संदीप शर्मा व अनुरीत सिंग यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला. 
 

Web Title: 151 against Kings XI Punjab