शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन बांगलादेशी मुलींची सुटका

By admin | Updated: June 27, 2017 03:34 IST

बांगलादेश येथून नवी मुंबईत फूस लावून पळवून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याची कारवाई, नवी मुंबई पोलिसांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बांगलादेश येथून नवी मुंबईत फूस लावून पळवून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याची कारवाई, नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना अटकही केली आहे. बांगलादेशातील नोडाईल जिह्यातील १५ व १७ वयोगटातील दोन अल्पवयीन मुलींना जोशीम सोबुर मुल्ला (२५), याने फूस लावून नवी मुंबईत पळवून नेल्याची माहिती मुंबईतील जस्टीस अ‍ॅण्ड केअर या स्वंयसेवी संस्थेला मिळाली होती. त्यामुळे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला याविषयी माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सुनीता भोर, पोलीस उपनिरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने नवी मुंबईच्या विविध भागांत शोध घेण्यास सुरु वात केली. या शोधमोहिमेदरम्यान बांगलादेशातून पळून आणलेल्या मुलांना तुर्भे स्टोअर्स भागातील एका खोलीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कुरिअर बॉय, तसेच जनगणना अधिकारी अशाप्रकारे वेशांतर करून अल्पवयीन मुलींचा शोध सुरू केला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने तुर्भे स्टोअर्समधील संशयित घरावर छापा मारला असता, सदर घरामध्ये बांगलादेश येथून बॉर्डरमार्गे पळवून आणलेल्या दोन्ही अल्पवयीन मुली आढळून आल्या. या वेळी मुल्ला दाम्पत्याने सदर मुलींचे लैंगिक शोषण होईल, अशा पद्धतीने त्यांना ठेवून त्यांच्याकडून घरकाम करून घेत असल्याचे आढळून आले. या वेळी दोन्ही मुलींकडे विचारपूस करण्यात आली असता, जोशीम मुल्ला याने त्यांना फूस लावून पळवून आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलींना पळवून आणणाऱ्या जोशीम मुल्ला व त्याची पत्नी मुर्शीदा जोशीम मुल्ला यांना अटक केली.