शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना आरक्षणाबरोबर संरक्षण हवेय

By admin | Updated: October 3, 2015 23:56 IST

केवळ आरक्षण असल्याने निवडणुकीकरता राजकारणात उतरलेल्या महिलांच्या मनस्वास्थाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रस्थापीत राजकारणीकडून ताब्यात राहणारया

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईकेवळ आरक्षण असल्याने निवडणुकीकरता राजकारणात उतरलेल्या महिलांच्या मनस्वास्थाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रस्थापीत राजकारणीकडून ताब्यात राहणारया महिलांनाच राजकारणात पुढे आनले जात आहे. यामुळे आरक्षणाबरोबरच महिलांना संरक्षणाची देखिल गरज व्यक्त होत आहे.नेरुळच्या नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. अवघ्या पाच महिण्याच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे मनस्वास्थ इतके बिघडले की, त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. मालादी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमीक अंदाज असुन त्यामागच्या कारणांचा तपास नेरुळ पोलीस करत आहेत. सहा वर्षापुर्वी अमरावती येथे देखिल अशाच प्रकारे एका महिला लोकप्रतिनिधीने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्यानंतर मालादी यांच्यासोबतच्या घटनेमुळे योगायोगाने राजकारणात आलेल्या महिलांच्या मनस्वास्थाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आरक्षणामुळे महिलांसाठी राखीव प्रभागात महिला उमेदवार रिंगणात उतरवल्या जातात. यावेळी तिथले प्रस्थापीत राजकारणी बोलक्या व निर्णयक्षमता असलेल्या महिलांना डावलुन मर्जीतल्या महिलांना पुढे आनतात. सक्षम महिला राजकारणात पुढे आल्यास त्यांना स्वतच्या राजकीय भवितव्याची भिती वाटत असते. यामुळे उमेदवारी देतानाच आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशीच महिला निवडली जाते. याकरिता त्या महिलेला राजकारणाची आवड किंवा पार्श्वभुमी आहे की नाही याचा देखिल विचार होत नाही. तर अशी महिला निवडुन आल्यानंतर मदतीच्या नावाखाली प्रस्थापीत राजकारणी तिच्या कामात हस्तक्षेप करतात. कालांतराने याचा मनस्ताप त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला होत असतो.अनेकदा संबंधीत निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेले पुरुष महिला आरक्षणाचा बळी पडतात. परंतु तो प्रभाग दुसरया कोनाच्या हातात जावु नये याकरिता ते स्वतच्या पत्नीला केवळ निवडणुकीकरता राजकारणात ओढतात. पत्नी निवडून आल्यानंतर हेच पुरुष निर्णय अधिकार स्वतकडे ठेवुन पत्नीला केवळ नामधारी ठेवतात. याची खंत त्या महिला लोकप्रतिनिधीच्या मनात कायमच घर करुन राहते. त्यामुळे एकदा राजकारणात आलेल्या अनेक महिला परत राजकारणात फिरकत नाहीत. सर्वच ठिकाणी हि परिस्थीती असुन त्याबाबात राजकीय पक्षांनीच धोरण राबवण्याची आवश्यकता आहे. शिवाय आरक्षणाबरोबरच महिलांना संरक्षणही देने गरजेचे आहे.सर्वच राजकीय पक्षांच्या महिला संघटना असुन त्या कितपत सक्षम आहेत हा देखिल प्रश्नचिन्ह आहे. अशा संघटनांना राजकारणात दुय्यम स्थान देवुन त्यांचा वापर केवळ कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठीच केला जातो. यामुळे समाजानेच महिला आरक्षण समजुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे.उत्तम घर चालवणारी महिला देखिल निर्णय स्वातंत्र्य दिल्यास राजकारणातही यशस्वी होवू शकते. परंतु निर्णयक्षमता असलेल्या महिलांना डावलुन मर्जीत राहणारया महिलांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आरक्षणाबरोबरच महिलांना संरक्षण हवे आहे. याबाबत राजकीय पक्षांनी योग्य धोरण राबवण्याची गरज आहे.- भीम रासकर, महिला राजसत्ता आंदोलन प्रमुख