शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिडको इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:08 IST

सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी लागू करण्यात आलेली १00 टक्के सहमतीची अट शिथिल करण्यात आली आहे.

नवी मुंबई : सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी लागू करण्यात आलेली १00 टक्के सहमतीची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ ५१ टक्के रहिवाशांची सहमती मिळाल्यास इमारतीची पुनर्बांधणी करता येणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंंद्र फडसवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींतून राहणाºया हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई विभागात सिडकोने बांधलेल्या इमारती अल्पवधीतच निकृष्ट ठरल्या आहेत. या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्र्बांधणीचा प्रश्न मागील वीस वर्षांपासून चर्चिला जात आहे. परंतु राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी २.५ एफएसआय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जाहीर करताना पुनर्बांधणीसाठी सोसायटीतील ७0 टक्के रहिवाशांची सहमती बंधनकारक करण्यात आली. तर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १00 टक्के सहमती असल्याशिवाय पुनर्बांधणीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुनर्बांधणीच्या कामाला खीळ बसली होती. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संपूर्ण सहमतीची अट शिथिल करावी, या मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पुनर्बांधणी रखडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. हजारो रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहमतीची अट १00 टक्क्यावरून ५0 टक्के इतकी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली होती. त्यानुसार सोसायटीतील ५१ टक्के रहिवाशांची सहमती असल्यास इमारतीची पुनर्बांधणी करता येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यामुळे निर्णय होवूनही मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पुनर्बांधणीच्या कामाला चालना मिळण्याची शक्यता आहे.