शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची तासन्तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:41 IST

तीन लाख लोकसंख्येच्या खारघर शहरात महावितरणच्या वतीने केवळ एकच वीज बिल भरणा केंद्र उपलब्ध असल्याने सध्या या वीज बिल भरणा केंद्रावर ग्राहकांची मोठी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : तीन लाख लोकसंख्येच्या खारघर शहरात महावितरणच्या वतीने केवळ एकच वीज बिल भरणा केंद्र उपलब्ध असल्याने सध्या या वीज बिल भरणा केंद्रावर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. तासन्तास रांगेमध्ये उभे राहून वीज बिल भरावे लागत असल्याने महावितरणने शहरात विभागनिहाय वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सध्याच्या घडीला शहरात सेक्टर १२ येथील महावितरण कार्यालयात वीज बिल भरणा केंद्र सुरू आहे. हे ठिकाण शहराच्या एका बाजूला असल्याने ग्राहकांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खारघर शहराची व्याप्ती मोठी आहे. सेक्टर ३५ सारखा परिसर शहराच्या दुसऱ्या टोकाला असल्याने या केंद्रावर पोहोचण्यास नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शहरात यापूर्वी सिडको मध्यवर्ती कार्यालय सेक्टर-४ या ठिकाणी महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र अस्तित्वात होते. मात्र, त्याचे टेंडर संपुष्टात आल्याने ते वीज बिल भरणा केंद्र बंद झाले आहे. खारघर सेक्टर-१२मध्ये असलेल्या वीज बिल भरणा केंद्रावर सध्या एका खिडकीतून संपूर्ण खारघरचे वीज बिल भरण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी असलेली इलेक्ट्रॉनिक मशिनदेखील अधूनमधून बंद पडत असल्याने ग्राहकांची या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. भरपावसात ग्राहकांना रांगेत उभे राहून बिल भरावे लागत आहे. शहरात सेक्टर-१२मधील महावितरण कार्यालयातील वीज बिल भरणा याव्यतिरिक्त आणखी पाच ठिकाणी पतपेढ्यांच्यामार्फत वीज बिल स्वीकारले जात आहे. शहरात महावितरणच्या वतीने सेक्टर ४, १९, ३५, १२ या ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. - व्ही. पी. बुधवंत, अधिकारी महावितरण