शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शन

By admin | Updated: October 1, 2015 01:55 IST

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण लालबागमध्ये दाखल होत असतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या लाखोंमध्ये असते.

पनवेल : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण लालबागमध्ये दाखल होत असतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या लाखोंमध्ये असते. मात्र ज्या भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन घडलेले नाही अशा भक्तांना पनवेलमध्ये राजाच्या दर्शनाची संधी प्राप्त होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना श्रीगौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये १ आॅक्टोबरला विराजमान केली जाणार आहे. उत्सवाचे हे २३ वे वर्ष असून याठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्र ेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून गौरा गणेशोत्सव साजरा केला जातो. या दोन्ही संघटनांचे अडीच हजारपेक्षा जास्त सभासद आहेत. लहान - मोठे उद्योगधंदे करून आपली उपजीविका भागविणाऱ्या व्यावसायिकांचा यामध्ये सहभाग आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठा बहरलेल्या असतात. याठिकाणचे विक्रे ते देखील उत्सवकाळात व्यस्त असल्याने त्यांना सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सहभागी होवून दर्शनाची संधी मिळत नाही. यामुळेच सर्व सभासदांनी एकत्र येवून गौरा गणेशाच्या स्थापनेची सुरु वात केली. या उत्सवादरम्यान पारंपरिक बाल्या नृत्याचे कार्यक्र म याठिकाणी सादर केले जाते. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड आदी भागातील लाखोंच्या संख्येने भक्तगण याठिकाणी येत असतात. (प्रतिनिधी)