शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील मैदानाचा होणार कायापालट

By admin | Updated: July 9, 2017 02:11 IST

वाशी, सेक्टर-१ येथील सुभाषचंद्र बोस मैदानाची दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी या मैदानाचा कायापालट करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी, सेक्टर-१ येथील सुभाषचंद्र बोस मैदानाची दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी या मैदानाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानाची डागडुजी करतानाच मैदानाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, संपूर्ण प्रभागात जवळपास ११ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय दिव्या गायकवाड यांनी घेतला आहे. त्याचा शुभारंभही करण्यात आला आहे.वाशीतील मुलांना खेळण्यासाठी मैदानांची कमतरता आहे. मैदाने आहेत; परंतु ते विविध शाळांशी संलग्न असल्याने अनेकदा त्यांना कुलुप असते. वाशी, सेक्टर-१मध्ये सुभाषचंद्र बोस हे एकमेव मैदान आहे. त्यामुळे या मैदानावर खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या मोठी असते. मात्र, नियमित डागडुजीअभावी या मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मैदानाच्या चारी बाजूला पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या उघड्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच येथे खेळताना गटारांत पडून दुखापत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी या मैदानाची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली होती. त्या संबंधीच्या कामाचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरीही मिळविली आहे. आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. मैदानाचे सपाटीकरण करून त्यावर लाल मातीचा भराव टाकला जाणार आहे. तसेच मैदानाच्या चारी बाजूला असलेल्या उघड्या गटारांवर झाकणे बसविली जाणार आहेत. मोडकळीस आलेल्या मैदानाचे सरंक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. या कामांसाठी १७ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तत्पूर्वी मैदानाच्या चारी बाजूंकडील मोकळ्या जागेवर हिरवळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शुक्रवारी नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नवी मुंबई इलेवन संघाचे महादेव डुंबरे, अजित कांडर, दत्ता पोळ, गिरीश चावरे, अर्जुन पाटील, नितीन सोनावणे, सुशांत पटनाईक, विनायक भोर आदींनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.