शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल एसटी स्टॅण्ड समोरील अनधिकृत गाळे हटविले

By admin | Updated: July 9, 2017 02:00 IST

पनवेल एसटी स्टॅण्ड समोर अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे उभे असलेले गाळे अखेर पालिकेने हटविले. शनिवारी पनवेल महानगरपालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए

- लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल एसटी स्टॅण्ड समोर अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे उभे असलेले गाळे अखेर पालिकेने हटविले. शनिवारी पनवेल महानगरपालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए व आयआरबी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. दोन दिवस ही मोहीम चालणार असून, महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी उन्नत मार्गाच्या रखडलेल्या एका मार्गिकेच्या कामाला यामुळे गती मिळणार आहे. पनवेल शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अर्धवट स्थितीत असल्याने सदर काम पूर्ण करण्यामध्ये त्या मार्गावरील बेकायदेशीर उभारण्यात आलेली अतिक्र मणे त्रासदायक ठरत होती. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेने वेळोवेळी सूचना, नोटिसा देऊनसुद्धा ही अतिक्र मणे काढण्यात येत नव्हती. पनवेल महानगरपालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए व आयआरबी यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी स्टॅण्डसमोरील बांधकामे, तसेच लक्ष्मी वसाहत परिसरातील रस्त्यालगतची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यासाठी जेसीबी तसेच अतिक्र मण विभागाचे अधिकारी व कर्मचारी इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पनवेल शहर पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. या वेळी स्वत: आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे या कारवाईवर लक्ष ठेवून होते. काही ठिकाणी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न झाला; परंतु या विरोधाला न जुमानता ही कारवाई धडकरीत्या राबविण्यात आली व अवघ्या काही तासांतच हा परिसर मोकळा करण्यात आला.