शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक

By admin | Updated: October 8, 2015 00:52 IST

उल्हासनगर येथील प्रोजेक्टमध्ये घरे खरेदीसाठी पैसे घेवून घर न देता फसवणूक करणाऱ्या मोनार्च सॉलीसेटर कंपनीच्या दोघा संचालकांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात

नवी मुंबई : उल्हासनगर येथील प्रोजेक्टमध्ये घरे खरेदीसाठी पैसे घेवून घर न देता फसवणूक करणाऱ्या मोनार्च सॉलीसेटर कंपनीच्या दोघा संचालकांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात मे महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार मंगळवारी मीरा रोड येथून दोघांना अटक करण्यात आली.कळंबोली येथे राहणाऱ्या नागेंद्रप्रताप सिंग यांची मोनार्च सॉलीसेटर कंपनीने फसवणूक केली होती. सिंग यांनी मोनार्च कंपनीच्या उल्हासनगर येथे सुरु असलेल्या प्रोजेक्टची माहिती घेतली. यावेळी कंपनीचे संचालक हसमुख ठाकूर, गोपाळ ठाकूर, रोशन व अशोक यांनी सिंग यांची भेट घेतली. त्यांनी सदर प्रोजेक्ट दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे सांगून नफ्याचे आमिष दाखवून दोन घरांचे बुकिंग करायला सांगितले. यानुसार सिंग यांनी पाच महिन्यात त्यांना ६६ लाख रुपये अ‍ॅडवान्स दिले होते. परंतु नियोजित कालावधी पूर्ण होवूनही त्यांना घर मिळाले नाही. त्यामुळे सिंग यांनी झालेल्या फसवणूक प्रकरणी मोनार्च बिल्डर्सच्या विरोधात गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे तक्रार केली होती. परंतु गुन्हा दाखल होण्यापूर्वी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून सर्व संचालक भूमिगत झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. मंगळवारी हसमुख व गोपाळ ठाकूर हे दोघे मीरारोड येथील एका हॉटेलमध्ये लपले असताना त्यांना अटक केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर तक्रारदार सिंग यांनी न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र सादर करून तक्रार मागे घेतली. त्यामुळे दोघांचीही सुटका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)