शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टीटीसीत ३00 एकर जमिनीवर अतिक्रमण

By admin | Updated: October 8, 2015 00:55 IST

टीटीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या सुमारे ३00 एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत शेकडो कोटींच्या

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईटीटीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या सुमारे ३00 एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे. त्यामुळे भूमाफियांच्या तावडीतून ही जमीन मुक्त करण्याचे मोठे आवाहन एमआयडीसी प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी औद्यागिक वसाहत म्हणून टीटीसी क्षेत्राची ओळख आहे. सुमारे २५ किमी क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या नियोजनात एमआयडीसी प्रशासनाला पुरते अपयश आल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून मागील १० वर्षांत या परिसरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे. नवी मुंबईत सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्याच जागेवर आहेत. व्यावसायिकांनीही अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात जागा बळकावल्या आहेत. अतिक्रमणांच्या माध्यमातून भूमाफियांनी एमआयडीसीची सुमारे ३00 एकर जमीन गिळंकृत केली आहे. एका जनहित याचिकेवर एमआयडीसीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे.पूर्वी या औद्योगिक वसाहतीला रस्ते, पाणी, वीज व इतर प्राथमिक सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जात होत्या. परंतु सन २00५ पासून या सुविधा महापालिकेडे वर्ग करण्यात आल्या आहेत. असे असले तरी या क्षेत्रातील बहुतांशी जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. त्यामुळे तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा एमआयडीसी प्रशासनाचीच आहे. असे असले तरी गेल्या १० वर्षांत भूमाफियांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एमआयडीसीकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उभारण्यात आली नाही. ही बाब भूमाफिया आणि झोपडपट्टीदादांच्या पथ्यावर पडल्याने शेकडो कोटींच्या जमिनीवर पाणी सोडण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.दिघ्यातील ९४ पैकी ९0 बांधकामे एमआयडीसीच्या जागेवर उभारली आहेत. या सर्व बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने या बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम छेडली आहे. असे असले तरी या बेकायदा इमारतींनी किती क्षेत्र व्यापले आहे, याचा तपशील एमआयडीसीकडे उपलब्ध नसल्याचे समजते.