शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी देखाव्यातून मांडले प्रश्न

By admin | Updated: September 23, 2015 04:17 IST

सगळीकडे गणेशोत्सवाचे प्रसन्न वातावरण आहे. अनेक जण विविध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत असतात. काही जण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे

वैभव गायकर, पनवेलसगळीकडे गणेशोत्सवाचे प्रसन्न वातावरण आहे. अनेक जण विविध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत असतात. काही जण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे उभारत असतात तर काही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत करीत असतात. मात्र खांदा कॉलनीतील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सात दिवसाच्या बाप्पाची स्थापना करून अनोखा देखावा साकारला आहे. मागील सहा महिन्यापासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. प्रलंबित प्रश्न देखाव्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. विविध मागण्यांचे फलक त्याठिकाणी लावून बाप्पां तुम्हीच आम्हाला न्याय द्या ही विनंती केली आहे. मागील सहा महिन्यापासून आपल्या हक्काची लढाई हे विद्यार्थी लढत आहेत. पनवेल तालुक्यातील कोलवडी येथे भाड्याच्या जागेत सुरु असलेल्या आदिवासी वसतिगृह सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी सोडलं होतं. तेंव्हापासून सुरु झालेली ही लढाई आजतागायत सुरु आहे. आपल्या विविध मागण्याकरिता विद्यार्थ्यांनी उपोषण, मोर्चे, मंत्र्याच्या भेटी, अधिका-यांच्या भेटी हे सर्वच मार्ग अवलंबले मात्र यश आले नाही. उलट पेण येथे काढलेल्या मोर्च्यामुळे ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वच मार्ग अवलबल्यनंतर शेवटी बप्पांना या विद्यार्थ्यांनी साकडे घातले आहे. यावेळी देखाव्यात लावेलल्या फलकांमध्ये विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये वासतिगृहातील विद्यार्थ्यांना न्याय मिळू द्या, सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळू दे, सर्वांना शैक्षणीक साहित्य पुस्तके, वह््या परीक्षा होण्या आगोदरच आभ्यासासाठी मिळू दे तसेच भ्रष्ट अधिका-यांना भ्रष्टाचारातून मुक्त कर आशाप्रकारच्या विनवण्या बाप्पांना या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. याशिवाय आदिवासीचे जीवन, राहणीमान याचा देखील जिवंत देखावा याठिकाणी उभारण्यात आला आहे. याच देखाव्यात महिला शक्तीचा जागर करण्यात आला आहे.