शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

तळोजा एमआयडीसीत वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:24 AM

तोंडरे गावातील प्रकार; पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार

कळंबोली : एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश सरकारकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड केली जात असून याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या वृक्षतोडीविरोधात शिवसेनेकडून पनवेल महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वृक्षारोपणाचा संकल्प करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे. पनवेल महापालिकेने यासाठी खास जैवविविधता नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यातून ते पशूपक्षी त्याचबरोबर वनस्पतींचे संवर्धन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे; पण महानगरपालिकेच्या हद्दीतील तळोजा एमआयडीसीच्या बाजूला म्हणजे भूखंड क्रमांक- ३१ डीसीपीएल या कंपनीच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामध्ये खैर, ताड, कडुलिंब, ऐन, किंजळ, आंबा, नारळ यांसारख्या अनेक झाडांचा समावेश आहे.तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हवेत विषारी वायू सोडले जात आहेत. या भागात वृक्षावळ असणे गरजेचे आहे; परंतु तोंडरे गावात मोठी वृक्षतोड सुरू आहे. परिसरात दीपक फर्टिलायझर या कंपनीने जवळपास ५० एकर क्षेत्र विकत घेऊन त्या ठिकाणी प्लांट टाकायचा आहे. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने झाडे होती. त्याची सर्रास तोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.महापालिकेने परवानगी दिली असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड कशी होऊ शकते? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने याबाबत परवानगी दिली आहे की नाही, याबाबत खुलासा करावा, अशी मागणी शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे. त्यांनी शुक्रवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र दिले आहे. तोंडरे येथे जी वृक्षांची कत्तल झाली याविषयी चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निकम यांनी केली.पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तळोजातील वृक्षतोड अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत वनाधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, तळोजातील तोंडरे हा भाग पनवेल महापालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे त्यांनी याविषयी कारवाई करावी, असेही सांगितले.तळोजा एमआयडीसीलगत तोंडरे गावाच्या हद्दीत अशा प्रकारे झाडे तोडले जात असतील तर त्वरित प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील आणि त्या जागेवर जाऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. या अगोदरही एमआयडीसी परिसरात झाडे तोडली म्हणून आम्ही गुन्हे दाखल केले आहेत.- तेजस्विनी गलांडे, सहायक आयुक्त, पनवेल महापालिका