शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रानसईमधील आदिवासींवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:04 IST

श्वानदंशामुळे दोघांचा मृत्यू व सात जण जखमी झाल्यामुळे रानसईतील सहा आदिवासी पाड्यांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने

नवी मुंबई : श्वानदंशामुळे दोघांचा मृत्यू व सात जण जखमी झाल्यामुळे रानसईतील सहा आदिवासी पाड्यांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने थेट गावामध्ये जाऊन विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक थेट गावामध्ये आल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूच्या डोंगरावर असलेल्या रानसईतील सहा आदिवासी पाड्यांकडे श्वानदंशाच्या घटनांमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनिकेत रवींद्र शिंगवा व धर्मी आयत्या दोरे या दोघांचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय कमळी नामदेव शिंगवा, आयत्या राघो दोरे, महेश भास्कर दोरे, सुजल दमेश दोरे, बबलू सोमा लेंडे यांनाही श्वान दंश झाला आहे. अनिकेतने चावा घेतल्याने त्याचे आजोबा धावू राया शिंगवा जखमी झाले असून जखमींच्या संपर्कात राहिल्याने किरण वामन दोरे या लहान मुलालाही बाधा झाली आहे. कुत्रा चावल्यानंतर तत्काळ रेबिजचे इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. परंतु याविषयी आदिवासी बांधवांना काहीही माहिती नसल्याने त्यांनी फक्त झाडपाल्याचे औषध घेतले, परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही. दोघांना जीव गमवावा लागला व इतर जखमींना अंगाला खाज येणे व इतर त्रास होवू लागल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेहोते.गावातील जवळपास ३५ नागरिकांनी कोप्रोली आरोग्य केंद्रामध्ये जावून प्रतिबंधात्मक लस घेतली होती. तेथील लस संपल्याने पाच जणांनी इतर ठिकाणच्या आरोग्य केंद्रामध्ये लस घेतली होती. अनिकेत शिकत असलेल्या आश्रमशाळेतील ७० पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली होती. पण प्रत्यक्ष आदिवासी पाड्यांवर मात्र औषधोपचार उपलब्ध करण्यात आले नव्हते. ‘लोकमत’ने याविषयी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उरणचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी तत्काळ कोप्रोलीतील डॉक्टरांचे पथक रानसईमध्ये पाठविले.आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने बुधवारी रानसईमधील प्रत्येक घरी जावून आरोग्य शिबिराविषयी माहिती दिली. गावामध्येच लस उपलब्ध करून दिल्यामुळे आदिवासी बांधवांनी शिबिरामध्ये गर्दी केली होती. कोणालाही बाधा होवू नये व मनातील भीती जाण्यासाठी सर्वांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. ज्यांना कुत्रा चावला आहे त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत.