शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीला वाहतूककोंडीचा अडथळा

By admin | Updated: July 9, 2017 01:59 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, नैना सिटी, एमआयडीसी, स्टील मार्केट यांसह पनवेल शहराची व्याप्ती वाढत आहे. पनवेल महापालिकाही या ठिकाणी नव्याने

- वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, नैना सिटी, एमआयडीसी, स्टील मार्केट यांसह पनवेल शहराची व्याप्ती वाढत आहे. पनवेल महापालिकाही या ठिकाणी नव्याने स्थापन झाल्याने भविष्यात स्मार्ट सिटी उभारण्याचा मानस पालिकेचा आहे. सिडकोने याकरिता ३२ हजार करोड रु पयांची तरतूद देखील केली आहे. मात्र, या सर्वांचे केंद्रबिंदू असलेल्या शहरातील वाहतूक व्यवस्था ही स्मार्ट सिटीला रोडा ठरू शकते. त्यामुळे कळंबोली सर्कलजवळ नव्याने दोन भूमिगत बोगदे उभारण्याची मागणी पनवेलमधील कफ या संस्थेने सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कळंबोली सर्कलजवळ सध्या वाहतूककोंडीची भीषण समस्या निर्माण झाली आहे. सायन-पनवेल महामार्ग, कळंबोली-मुंब्रा मार्ग, जेएनपीटी-कळंबोली मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींसह स्टील मार्केटकडे जाणाऱ्या मार्गिका या ठिकाणाहून जातात. विशेष म्हणजे, सायन-पनवेल महामार्ग हा आठपदरी, मुंब्रा-कळंबोली मार्ग दुपदरी, नव्याने निर्माण होणारा जेएनपीटी-कळंबोली महामार्ग आठपदरी, द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशिकेबाहेर जाण्याचा मार्गही या ठिकाणीच असल्याने, या ठिकाणी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिसेकंद ६ वाहने या ठिकाणाहून मार्गक्र मण करीत असतात. सर्कलची उभारणी करताना भविष्याचा विचार केला गेला नसल्याने सध्याच्या घडीला पनवेल शहर, तसेच या ठिकाणाहून कोठेही जाण्यासाठी कळंबोली सर्कल हा मोठा अडथळा ठरत आहे. यासंदर्भात सिटिझन युनिट फोरमनचे अध्यक्ष अरु ण भिसे, सदस्य अमित रणदिवे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या भेटीमध्ये कफने वाहतूककोंडी टाळण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावर आसुडगाव ते कळंबोली सर्कलच्या पुढे हलक्या वाहनांसाठी दोन भूमिगत बोगदे बांधण्याची मागणी केली आहे.कळंबोली सर्कल या ठिकाणची वाहतूककोंडीसंदर्भात आम्ही प्रस्ताव तयार करीत असून, याकरिता कन्सल्टन्सी नेमण्याची प्रक्रि या सुरू आहे. सिटिझन युनिटी फोरमने दिलेल्या प्रस्तावाबाबत आम्ही विचार करून आवश्यक बाबीचा आम्ही आमच्या प्रस्तावात नक्कीच विचार करू. - हेमंत फेगडे, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकळंबोली सर्कलजवळील वाहतूककोंडी संदर्भात मी स्वत: एमएसआरडीसीला दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला आहे. आम्हाला यासंदर्भात त्यांचे उत्तर प्राप्त झालेले नाही. यासंदर्भात आम्ही नव्याने या विषयाचा पाठपुरावा करू. - नितीन पवार, वाहतूक पोलीस उपायुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय