शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

माथाडी कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:41 PM

कोरोनामुळे ऑनलाइन समारंभ : माथाडी भवनमध्ये निवडक पदाधिकारी राहणार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित होणार आहे. कोरोनामुळे जाहीर मेळाव्याऐवजी माथाडी भवनमध्ये निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २५ सप्टेंबरला एपीएमसीमध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यामध्ये प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहत असतात. माथाडी कामगारांचे प्रश्न व चळवळीवर चर्चा या मेळाव्यात होत असते. अनेक प्रश्नांना या मेळाव्यातून वाचा फोडली जाते व ते शासनाकडून सोडवून घेतले जातात. राज्यातून १० हजारपेक्षा जास्त कामगार या मेळाव्याला उपस्थित राहत असतात. राजकीयदृष्ट्याही या मेळाव्याला विशेष महत्त्व असते. अनेक आमदार, मंत्री व लोकप्रतिनिधी मेळाव्यास आवर्जून उपस्थित असतात. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मुुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदारसंघांत माथाडी कामगारांची मते निर्णायक ठरत असल्यामुळेही लोकप्रतिनिधी कामगारांशी स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी मेळाव्यास येत असतात.

या वर्षी कोरोनामुळे ३८ वर्षांमध्ये पहिल्यांदाच माथाडी कामगारांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कांदा - बटाटा मार्केटमधील जाहीर मेळाव्याऐवजी माथाडी भवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यास राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कामगारांना हा कार्यक्रम आॅनलाइन पाहता येणार आहे. प्रत्येक वर्षी दिला जाणारा ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचेही या वेळी वितरण करण्यात येणार आहे.अनेक प्रश्नांना वाचा फोडली जाते व ते शासनाकडून सोडवून घेतले जातात.माथाडी कामगारांचे प्रश्न व चळवळीवर चर्चा या मेळाव्यात होत असते.