शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शौचालये असुरक्षित

By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST

राष्ट्रीय स्वच्छता अभियाना दरम्यान चक्क पालिका शौचालये सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. त्यावर अतिक्रमणाचे काम नगरसेवक करीत असून पालिकेने

उल्हासनगर : राष्ट्रीय स्वच्छता अभियाना दरम्यान चक्क पालिका शौचालये सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. त्यावर अतिक्रमणाचे काम नगरसेवक करीत असून पालिकेने कारवाई ऐवजी धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. नकाशावरील शेकडो शौचालये गायब झाली असून याची पालिका दप्तरी नोंद नाही. शहरातील अवैध बांधकामावर न्यायालयात जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली असून १५ आॅक्टोबर रोजी पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अवैध बांधकामाची यादी तयार करण्याचे काम सुरू असतांना स्वच्छता अभियानात पालिकेच्या शौचालयांवर डल्ला मारण्यायचे प्रकार उघड झाले आहेत. यामागे नगरसेवकाचे नाव येत असल्याने आयुक्तासमोर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा सेक्शन विभागात शौचालय हडप झाल्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर चौकशीचे उत्तर त्यांना द्यावे लागले. त्याच प्रमाणे भाजपा नगरसेवक जमनुदास पुरस्वानी, जया माखिजा यांच्या प्रभागात शौचालय हडप होऊन कारवाई झाली नसल्याचे उघड झाले आहे. कैलास कॉलनी, गायकवाड पाडा, तानाजीनगर,भैय्यासाहेब आंबेडकरनगर आदी परिसरात शौचालये हडपून बांधकामे उभी राहिली आहेत.सुरवातीला खुले भूखंड त्यानंतर आरक्षित भूखंड, लहान-मोठे उद्याने आता शौचालयावरच भूमाफियांनी अतिक्रमणे सुरू केली आहेत. स्थानिक नगरसेवक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप होत असून त्यांनी अतिक्रमणवेळी पालिकेला तक्रार का केली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपा नगरसेवक जमनुदास पुरस्वानी यांच्या भावासह वहिनी, नगरसेवक राम चार्ली यांच्या मुलावर यापूर्वी एमआरटीपीचे गुन्हे दाखल झाली आहेत. मात्र बांधकामावर कारवाई न होता. ती जैसी थे उभी आहेत.