शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘होप’कडे ठाणेकरांची पाठ

By admin | Updated: October 1, 2015 23:28 IST

संकटात सापडलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्याला तत्काळ पोलीस मदत मिळावी, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी सुरू केलेले अ‍ॅप्लिकेशन ‘होप’ आता एक हजारी झाले आहे

ठाणे : संकटात सापडलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्याला तत्काळ पोलीस मदत मिळावी, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी सुरू केलेले अ‍ॅप्लिकेशन ‘होप’ आता एक हजारी झाले आहे. मात्र, प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन असतांनाही व सहजपणे तसेच मोफत डाऊनलोड होणाऱ्या या अ‍ॅप्लिकेशनपासून नागरिक फटकून राहत आहेत. नागरिकांनी इतर अ‍ॅप्लिकेशन्स सोबत ‘होप’ही डाऊनलोड करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोलीस मदत मिळवण्यासाठी यापूर्वी १०० नंबर डायल करावा लागत होता. मात्र, आधुनिकतेची कास धरून २०१५ च्या जून महिन्यात शहर पोलिसांनी नागरिकांसाठी हे अ‍ॅप्स सुरू केले. या सुविधेशिवाय सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयोगी अशा विविध अत्यावश्यक सेवा त्याद्वारे दिल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी हेल्पलाइन, अ‍ॅण्टीरॅगिंग हेल्पलाइन, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, अपघात मदत, लहान मुलांसाठी हेल्पलाइन, अग्निशमन सेवा इत्यादी तातडीच्या सेवांचा समावेश आहे. तसेच महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती, सायबर क्राइम इत्यादींसंदर्भात कशी काळजी घ्यावी, याबाबत सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम, दंडाची रक्कम, विविध परवाने काढण्यासाठी लागणारा कालावधी, चोरीस गेलेल्या वाहनाचा तपशील, हरवलेल्या व्यक्तींची माहिती, पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती इत्यादी बाबींचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. तरीसुद्धा, जूनपासून सप्टेंबरपर्यंत फक्त एक हजार नागरिकांनीच हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)